संगमनेर | झुंजार न्यूज 

संगमनेर तालुक्यातील पिंप्रीलौकी – अझमपूर येथील एका ४६ वर्षिय व्यक्तीवर सकाळी नऊ वाजता दाढ खुर्द शिवारात बिबट्याने हल्ला केला मात्र लोकांची तप्तर मदत मिळाल्याने त्यांचा जीव वाचला . 

 मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र गीते हे आपल्या घराकडून दाढ खुर्दच्या दिशेने सकाळी ९ वाजता दुचाकीवर आपल्या मळ्यात जात असताना दाढ खुर्दच्या शिवारातील असणाऱ्या लोखंडी पुला जवळ दबा धरुन बसलेल्या बिबट्याने राजेंद्र गीते यांच्या हल्ला केला . हल्ल्यात राजेंद्र गीते खाली पडले मात्र सावध होवून मोठ्याने आरडा – ओरड केल्याने आजू- बाजूच्या लोकांनी धाव घेतल्यामुळे त्यांच्या जीव वाचला .
राजेंद्र गीते यांच्या पायाच्या बिबट्याने धरल्याने बोटाला दात लागल्याने किरकोळ जखम झाली  त्यांना प्राथमिक उपचाराकरिता दाढ खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले . मात्र पुढील उपचाराकरिता गीते यांना अहमदनगर येथे हलविण्यात आले . याबाबत वनविभागाला कळविण्यात आले . 

चौकट

१ ) तालुक्यातील पुर्व भागातील दाढ खुर्द , दाढ बु ॥ , प्रतापपूर , खळी , पिंप्री लौकी अझमपूर , पानोडी , शेडगाव , शिबलापूर आदी परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या असून वनविभागाने त्वरीत या बिबट्याचा बदोबस्त करावा अशी मागणी केली आहे .
२ ) दाढ खुर्द  शिवारात महीन्यामध्ये ही दुसरी घटना असल्याने लोकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली असून वनविभागाने त्वरीत पिंचरा लावून बिबट्यास जेल बंद करावे 
सतिष जोशी ( संरपच , दाढ खुर्द )
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed