स्व.अशोकराव मोरे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

संगमनेर । झुंजार न्यूज

सातत्याने सर्वसामान्यांशी नाळ जोडून त्यांच्या प्रश्नांसाठी झटणारे स्वर्गीय अशोकराव मोरे हे तळमळीचे सहकारी होते अशी भावपूर्ण आदरांजली काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली असून त्यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष स्वर्गीय अशोकराव मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे ,शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विश्वासराव मुर्तडक, जि प सदस्य अजय फटांगरे, सुरभी मोरे,निखिल पापडेजा ,गौरव डोंगरे ,प्रा बाबा खरात,राजेंद्र चकोर, ॲड .सुहास आहेर ,श्रीराम कू-हे, संतोष मांडेकर, विजय राहणे,शिवाजी गोसावी, तात्याराम कुटे,आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते..

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, स्वर्गीय अशोकराव मोरे यांनी केलेल्या जनसामान्यांच्या कामामुळे ते आजही प्रत्येकाच्या हृदयात आहेत तळमळीचा व जिवाभावाचा सहकारी अशी त्यांची ओळख होती सातत्याने गोरगरिबांच्या प्रश्नासाठी लढताना त्यांनी पंचायत समितीचे सभापती,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पद अत्यंत सक्षमपणे सांभाळले. अत्यंत कमी वयात त्यांच्या निधनाने पक्ष संघटनेची मोठी हानी झाली.  मात्र ते आजही प्रत्येकाच्या हृदयात आहेत अशी भावना आमदार थोरात यांनी व्यक्त केली.

तर मिलिंद कानवडे म्हणाले की आमदार बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय अशोकराव मोरे यांनी तालुका पक्ष संघटनेत मोठे काम केले. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करण्याची त्यांची पद्धत तरुण कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक ठरणारी असल्याचे ते म्हणाले

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed