संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पुर्व भागाकडील गावांतील लोकांना प्रवासाकरिता महत्वाची ठरणारी संगमनेर शिबलापूर मार्गे अहमदनगर बस तातडीने सुरु करण्याची मागणी होत आहे .
कोरोना काळापुर्वी शिबलापूर मार्गे जाणाऱ्या राहुरी व अहमदनगर अशा दोन बस सुरु होत्या यामुळे जाखुरी , पिंपरणे , डिग्रस , अंभोरे , मालुंजे , हंगेवाडी , शेंडगांव , आश्वी बु ॥ , आश्वी खुर्द , शिबलापूर , पानोडी , पिंप्री लौकी अजमपूर , खळी , झरेकाठी , उंबरी – बाळापूर , कानडगांव , दाढ खुर्द , या गांवातील लोकांना राहुरी , नगर करिता प्रवास हा सुलभ झाला होता . बहुतांश शेतकऱ्यांचा कांदयामुळे राहुरीकडे संपर्क असल्याने बस सेवा नसल्याने कुचबंना होत आहे .
राहुरी बस ही संगमनेरहून ११ वाजता तर नगर बस ही २ वाजता निघत असल्याने या गावांतील विदयार्थी , प्रवाशी यांना ही बस सोयीस्कर असत . त्यानंतर राहुरी ही बस राहुरीवरुन ३ वाजता निघत असल्याने शिबलापूर परिसरातील नोकरदारांनी ही बस अत्यंत उपयोगी पडत आहे तर संगमनेर नगर बस ही नगरहून सायंकाळी ६ वाजता निघून आश्वी येथे मुक्कामी येत असल्याने आश्वी परिसरातील लोकांना ही फार उपयोगी असून आश्वीहून नगरला सकाळी ६ वा बस नोकरदार , विदयार्थीसह प्रवाशांना फार उपयोगी असत मात्र गेल्या दोन – तीन वर्षापासून या दोन्ही बस बंद झाल्यामुळे येथील विदयार्थी , नोकरदार , शेतकरी व प्रवाशांची मोठी हाल होत आहे
याबाबत अॅड पोपटराव वाणी , पचायत समिती माजी सदस्य तबाजी मुन्तोडे , संदिपराव घुगे , रिपाई नेते आशिष शेळके , भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव सचिन शिंदे , भारतराव गीते , दाढ खुर्द संरपच सतिष जोशी , आश्वी बु॥ संरपच महेश गायकवाड , अंकुशराव कांगणे , रमेशराव गीते , रमेश सांगळे , अशोकराव जर्हाड , शिबलापूर उपसंरपच सुनिल मुन्तोडे , दिपक रक्टे , राजेंद्र जाधव , संजय जाधव , भारत शेवाळे , रावसाहेब घुगे , रिपाई नेते किशोर वाघमारे , वाघमारे सर , संजय खरात , यांनी वेळोवेळी निवेदन देवून ही बस सुरु होत नसल्याने ही प्रवाशांची जाणुन – बुजून कुचबंना करण्याचे धोरण असल्याची चर्चा होवू लागली आहे .
चौकट ..
राज्याचे महसूल तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांना संगमनेर शिबलापूर मार्गे राहुरी , नगर बस सेवा सुरु करावी याबाबत निवेदन दिले होते विखे पाटील यांनी तातडीने बस सेवा सुरु करण्याचे आदेश दिले होते मात्र दोन महीने होवून कारवाई झाली नाही , विदयार्थ्याचे शैक्षणिक वर्ष सुरु झाल्याने संगमनेर बस आगारानी बस सुरु करण्याचे त्वरीत निर्णय घ्यावे
अॅड पोपटराव वाणी ( माजी सदस्य , प स संगमनेर )
Post Views: 186
