संगमनेर / झुंजार न्यूज
हिरालाल पगडाल हे फुले शाहू आंबेडकर विचारसरणीचे विचारवंत व लेखक असून त्यांचे यापूर्वीही इलेक्शन बीलेक्षण हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयातील के.बी. दादा सभागृहात रविवार दिनांक 9 जुलै 2023 रोजी दुपारी 4 वाजता चिन्नण्णा या पुस्तकाचा रविवार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजीव सोनवणे यांच्या हस्ते प्रकाशन होणार असून यावेळी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात ,महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. तर माजी आमदार डॉ सुधीर तांबे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत =
यावेळी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ संजय मालपाणी, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, उत्कर्षा ताई रूपवते, चपराक प्रकाशनचे लेखक व प्रकाशक घनश्याम पाटील, डॉ संतोष खेडलेकर, संदीप वाकचौरे आदींसह साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत
तरी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी संगमनेर मधील सर्व साहित्य प्रेमी, नागरिक, महिला व युवकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जय हिंद लोक चळवळ , चपराक प्रकाशन व पुस्तक प्रकाशन सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे..
