संगमनेर / झुंजार न्यूज
कॅथोलिक शाळा व सोनगाव पंचक्रोशीसह गावचे मिळालेले प्रेम माझ्या आयुष्यात कधीही विसरणार नसून या गावांनी व शाळेने मला खूप साथ दिली असल्याचे गौरवोद्गार सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक दादासाहेब वाघमारे यांनी सेवापूर्ती कार्यक्रमाच्या सत्काराला उत्तर देताना म्हणाले .
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे पोलीस पाटील भास्करराव पलगडमल रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे सरचिटणीस किशोर वाघमारे राहुरी तालुका रिपब्लिकन पक्षाचे आंबेडकर गटाचे तालुका उपप्रमुख रमेश पलघडमल प्रवारानगर चर्चे फादर विलास सोनवणे सोनगाव पॅरिसचे फादर अमोल पादरेपीओ इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक पत्रकार वाकचौरे वैजापूरचे ब्रदर सोनवणे श्रीमती अनिताताई वाघमारे सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार जगन्नाथ शेळके एसटीचे सेवानिवृत्त अधिकारी श्री शेळके साहेब प्राध्यापक बाळासाहेब वाघमारे सर शाळेच्या शिक्षिका साळवे मॅडम मुख्याध्यापक लोखंडे सर यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी दादासाहेब वाघमारे यांनी आपल्या जीवनातील आठवणीला उजाळा देत 37 वर्ष शिक्षकेपेक्षा मध्ये काम करताना अनेक आठवणी त्यांनी करून देत सोनगाव शाळेमध्ये अनेक गोष्टींच्या त्यांनी आठवणी देत आठवणींना उजाळा देत येथील विद्यार्थी मोठ्या पदावर काम करत आहेत तीच खरी आमच्या कामाची पावती असून शाळा व्यवस्थापन व शिक्षक कर्मचारी यांनी मला खूप सहकार्य केलं तसेच माझी पत्नी माझे नातेवाईक माझे गाव यांनी अनमोल असे सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी असून 37 वर्षे पहिले इयत्ता दहावी पास झाल्यानंतर घरचे अत्यंत गरीबी आई वडील कबाड कष्ट करतात परंतु इयत्ता दहावीला चांगले मार्क मिळाल्यामुळे डीएड करता आले परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपाशीर्वादाने माझी परिस्थिती नसता नाही डीएड करून मला मोफत नोकरी शासनाची मिळाल्यामुळे मी स्वतः माझ्या फार उभे राहून माझ्या गावातील अनेक तरुण यांना स्वतःच्या पायावर उभे करून नोकरीस मुंबई पुणे येथे पाठवले व माझा मुलगा व सून इंजिनियर असून माझी एक मुलगी बीएससी नर्सिंग आहे व एक मुलगी इंजिनिअर डिग्री आहे हे केवळ नोकरीमुळे व शिक्षणामुळे मी करू शकलो याचा मला खूप अभिमान असून मी या शाळेला व या गावाला माझ्या आयुष्यामध्ये कधीही विसरणार नसून या शाळेचे विद्यार्थी माझे नेहमी केंद्रबिंदू असून मी नेहमी या शाळेला सहकार्य करेल असे अपेक्षा व्यक्त करत दादासाहेब वाघमारे सर यांनी आपल्या सेवानिवृत्ती शेतकऱ्याला उत्तर दिले
यावेळी शाळेच्या शिक्षिका साळवे मॅडम व घेगडमल मॅडम यांनी वाघमारे यांच्या जीवनातील काही आठवणी सांगत डोळ्यांमध्ये अश्रू येत आपल्या सहकार्याला पुढील उत्तम आरोग्याला शुभेच्छा दिल्या
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी मुख्याध्यापक बनसोडे यांनी केले असून त्यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यातील अनेक आठवणी सरांच्या सांगत आमचा एक आदर्श सहकारी आमच्यातून कमी होत असल्याचे दुःख आम्हाला होत असल्याचे आभार प्रदर्शन केले
