संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र जाखुरी या ठिकाणी अदिक मासात होत असलेल्या विश्व गौरव विभूषित महायोगी परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या नावाने पुरुषोत्तम मासात होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळा 9 ऑगस्ट ला सुरू होत असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात असून परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांचा पुण्यपूर्व अखंड हरिनाम सप्ताह पर्व सातवे या वर्षी श्री क्षेत्र पुण्यभूमी जाखुरी या ठिकाणी 9 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2023 या कालावधीत होणार आहे या ठिकाणी जवळपास 20 एकर जागेत या भव्य दिव्य सप्ताहाचे आयोजन केले आहे
सप्ताहात मुख्य कार्यक्रम शिवकथा महापुराण ह भ प माधवदास महाराज राठी नाशिक यांच्या कर्णमधुर वाणीतून भाविकांना ऐकायला मिळणार आहे यासाठी ३५० बाय २०० असा भव्यकथा मंडप उभारण्यात आला आहे भोजनासाठी ४०० बाय १०० असा भव्य मंडप उभारण्यात आला असून या परिसरात एक लाख 82 हजार स्क्वेअर फुट मंडपाची उभारणी करण्यात आली आहे सर्व मंडप वॉटरप्रूफ आहे तसेच सर्वांना शुद्ध पाणी, साधूंसंत विश्रांती मंडप, यज्ञ मंडप, घटस्थापना मंडप ,महिला जप मंडप, प्रहारेकरी मंडप तयार झाले असून यासाठी जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली 70 ते 80 मजूर गेली वीस दिवसापासून रात्रंदिवस परिश्रम घेत आहे त्याचप्रमाणे प्रत्येक गावात बॅनर पोस्टर लावण्यासाठी हजारो गगनगिरी भक्त परिश्रम घेत आहे या सप्ताह अनेक मान्यवर भेटी देत असतात साधू संतांचे दर्शन होते लाखो भाविक सात दिवस आमटी भाकरीचा प्रसाद घेतात तसेच या ठिकाणी भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन भरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे
दिवसेंदिवस या सप्ताह भाविकांची गर्दी होत वाढत आहे तर सप्ताहात हजारो स्वयंसेवक असणार आहे या स्वयंसेवकांद्वारे सप्ताहात अन्नदानाच्या ठिकाणी भाविकांची सेवा होणार आहे यावेळी सप्ताहाचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे यांनी व संजय महाराज देशमुख यांनी सप्ताह विषयी माहिती दिली वसंतराव देशमुख व जाखुरी पिंपरणे कनोली अंभोरे देवगाव शिरापूर निमगाव टेंभी कोळवाडे हंगेवाडी नागपूरवाडी जोर्वे खराडी वाघापूर या गावातील भक्त मंडळ यावेळी उपस्थित होते
