नाशिकचे माधवदास राठी यांच्यावाणीतून होणार शिवपुराण कथा

संगमनेर । झुंजार न्यूज 

संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे अधिकमासाचे औचित्य साधून दिनांक ९ ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या कालावधीमध्ये परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज भव्य अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयो जन करण्यात आले आहे या वर्षी प्रथमच नाशिक येथील माधवदास महाराज राठी यांच्या वाणीतून”शिवपुराण कथा ” श्रवण करण्याची संधी भाविक भक्तांना मिळणार आहे

संगमनेर तालुक्यातील समनापुर देव तळे पिंपरणे पिंपळगाव देपा यागावांमध्ये परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचा सप्ताह झालेला आहे पिंपळगाव देपाच्या सप्ताहमध्ये जाखुरी गावच्या ग्रामस्थांनी सप्ताहाची मागणी केली होतीमात्रमागील अधिक मासामध्ये कोविडची पार्श्वभूमी असल्यामुळे सप्ताह होऊ शकलेला नाही त्यानंतर या अधिकमासामध्ये जाखुरी करांना हा सप्ताह घेण्याचा मान मिळाला आहे या अखंड हरिनाम सप्ताहाचीतयारी अंतिम टप्प्यात आलेली असून २० एकरा च्या परिसरात हा अखंड हरिनाम सप्ताह होत आहे सप्ताहाच्या कालावधीमध्ये अखंड ज्ञानेश्वरी पारायण चालणार आहे

आत्तापर्यंत झालेल्या सर्व अखंड हरि नाम सप्ताहमध्ये रामराव महाराज ढोक यांच्या वाणीतून रामकथा केशव महाराज उखळीकर व रामगिरी महाराज यांच्या वाणीतून भागवतकथा तसेच संजय महा राज पाचपोर यांच्या वाणीतून रामायण कथा श्रवण करण्याची संधी भाविकांना मिळाली आहे मात्र यावेळी होणाऱ्या या सप्ताहाच्या सात दिवसाच्या कालावधी मध्ये दररोज दुपारी नासिक येथील माध वदास महाराज राठी यांच्या वाणीतून सर्व प्रथमच शिवमहापुराण कथा श्रवण कर ण्याची संधी भाविकांना मिळणार आहे

तसेच शेवटच्या दिवशी महाराष्ट्रातील थोर समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देश मुख इंदोरीकर यांच्या काल्याच्याकीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे
या सप्ताहाच्या कालावधीत दररोज सायंकाळी जयवंत महाराज पाटीलउद्धव महाराज मंडलिक सोपान महाराज शास्त्री ज्ञानेश्वर महाराज जळकेकर ,संजय महा राज पाचपोर नामदेव महाराज शास्त्री,व निवृत्ती महाराज देशमुख या राज्यातील नामांकित कीर्तन कारांची कीर्तने होणार आहे तसेच शिवचरित्रकार एस झेड देश मुख दिपक महाराज देशमुख शालिनीताई महाराज इंदुरीकर परांजपे मॅडम इंद्रजीत देशमुख आणि सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचे ही व्याख्याने होणार आहेत तसेच शेतकरी दूध उत्पादकआणि शहीद जवानांच्या परिवाराचा गौरव सुद्धा यावेळी करण्यात येणार आहे

सप्ताहमध्ये येणारे सर्व भावीक भक्त हे शेतकरी असतात त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडावे आणि उत्पादनात वाढ व्हावी म्हणून प्रत्येक सप्ताहमध्ये स्वामी गगन गिरी महाराज यांच्या कल्पनेतून गगन भरारी कृषी महोत्सवाचे आयोजन कर ण्यात येत आहे असाच कृषी गगन भरारी कृषी महोत्सव सुद्धा या सप्ताहात आयो जित करण्यात आलेला आहे तरी याकृषी महोत्सवाचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह कमि टीच्या वतीने करण्यात आले आहे

चौकट
स्वामी गगनगिरी महाराज सप्ताहचा रवि वारी होणार ध्वजारोहण

संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र जाखुरी येथे होत असणाऱ्या परमपूज्य स्वामी गग नगिरी महाराज अखंड हरिनामसप्ताहाचा ध्वजारोहण समारंभ रविवार दिनांक ३० जुलै २०२३रोजी सकाळी ११ वा सप्ताह स्थळी खोपोली मठाचे बालयोगी गणेशगिरी महाराज यांच्यासह अनेक साधु संतांच्या तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहन करण्यात येणार आहे तरी या ध्वजारोहन कार्यक्रमास तालुक्यातील भावीक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *