संगमनेर । झुंजार न्यूज
सध्याच्या धावपळीच्या युगात कर्मचारी अधिकारी यांच्यासह सर्वजण आपल्या आरोग्याकडे कायमच दुर्लक्ष करतात. कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी एसएमबीटी हॉस्पिटलच्या वतीने एक दिवसीय आरोग्य शिबिर संपन्न झाले असून यावेळी कुणीही आपल्या आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष करू नये असे आवाहन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.
एसएमबीटी हॉस्पीटल धामणगांव व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा.आ.डॉ.सुधीर तांबे,कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ,संचालक डॉ.तुषार दिघे,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर,डॉ.एम.डी.घुले,किरण कानवडे,शरद गुंजाळ,एसएमबीटीचे डॉ.धनंजय इल्हे , डॉ. योगेश दिघे, डॉ. दादा थोरात, डॉ.प्रशांत भागवत, शिंगाई मॅडम, संदिप अरगडे, विजय हासे, सुभाष मंडलिक, शंकर गाडे, प्रविण घुले, कैलास मांडे, अमित शिंदे, शाकीब बागवान आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ.तांबे म्हणाले कि, सध्याच्या युगात अनेक नागरिकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे मोठा आजार ही लवकर लक्षात येत नाही. म्हणून पुढील काळासाठी आरोग्य शिबिराचे मोठे जाळे निर्माण करण्याची गरज आहे. आजच्या युगात ह्दय विकाराचे प्रमाण वाढले असून आरोग्य शिबिरामार्फत कर्मचाऱ्यांनी आपली संपूर्ण तपासणी करुन घेतली पाहिजे.
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मागदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्रातील सर्वात अत्याधुनिक हॉस्पीटल एसएमबीटी ने मोठा लौकिक निर्माण केला आहे. म्हणून आज थोरात कारखाना व एसएमबीटी हॉस्पीटल यांच्या वतीने थोरात कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असून कर्मचाऱ्यांनी या आरोग्य शिबिरात आपल्या आरोग्याची तपासणी करुन घ्यावी.
बाबा ओहोळ म्हणाले कि, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना कर्मचाऱ्यांच्या हिताचे उपक्रम राबवत असून अमृत उद्योग समूहातील प्रत्येक कर्मचारी हा आपल्या कुटुंबातील घटक मानून परिवाराची काळजी आपले नेतृत्व कायम घेत असते. धावपळीच्या युगात कर्मचारी कायम स्वतः च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो. कारखान्याच्या वतीने कर्मचाऱ्यांची तपासणी होणार असून या तपासणीची फी कारखाना भरणार आहे.तरी या आरोग्य शिबिराचा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाभ घ्याव असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या शिबीरामध्ये ह्दय तपासणी,रक्त तपासणी,रक्तातील चरबी तपासणी,शुगर,रक्तदाब,ब्लड ऑक्सिजन तपासणी यासह आरोग्याविषयी सर्व तपासणी केली आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. यावेळी कारखान्यातील सर्व विभागांच्या कर्मचाऱ्यांनी आपले आरोग्य तपासणी करून घेतली.
