कल्याण ते मुंबई आ सत्यजीत तांबे यांचा रेल्वेने प्रवास !
मुंबई । झुंजार न्यूज
काल दुपारी संगमनेरवरून मुंबईला अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी निघालो होतो. या प्रवासात नाशिक-मुंबई हायवेवर भिवंडीमध्ये ट्रॅफिकमध्ये ३-४ तास अडकलो. शेवटी एका मित्राने सल्ला दिला की, कल्याणवरुन लोकल ट्रेनने लवकर पोहोचशील! मग काय, भिवंडी बायपासवरुन कल्याणच्या दिशेने प्रवास सुरु झाला, तेथेही ३० मिनिटांच्या प्रवासाला ३ तास लागले आणि अखेर ट्रेनने मुंबईकडे निघालो.
खरं तर कालच्या या प्रवासानंतर मुंबई महानगर प्राधिकरणाअंतर्गत येणाऱ्या पालघरपासून ते पनवेलपर्यंत आणि कल्याण-डोंबिवलीपासून मुंबईपर्यंतच्या जनतेविषयी प्रचंड आदर वाढलाय! किती सहनशील जनता आहे!
मुंबईच्या अवतीभवती पायाभूत सुविधांचा पुरता बोजवारा उडालाय, माणसाच्या जीवनशैलीची ऐशीतैशी झालीय, पण आपली सहनशीलता अजूनही संपायचे नाव घेत नाही.
