मुंबई । झुंजार न्यूज
मणिपुरमध्ये दोन आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण समोर आले त्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्याविरोधात चेंबूर पंजरापोळ येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीन व माजी मंत्री पक्षाचे राष्ट्रीय सरचिटनिस अविनाश महातेकर साहेब यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले त्याच प्रमाणे दोषिंवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली
यावेळी आंदोलकान्नी काळे रुमाल बांधून या घटनेचा निषेध करण्यात आला. येथिल अनुष्क्तिनगर चेंबूर तालुका अध्यक्ष सुभाष साळवे यांच्या अध्यक्षतेखाली चेंबूर चे पोलिस निरीक्षक यांना निवेदन देन्यात आले. या प्रसंगी मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थभाई कसारे जिल्हाध्यक्ष संजयभाई डोळसे चेंबूर तालुकाध्यक्ष रवि गायकवाड अनीस पठान साहेबराव ससाने दिनेश शिंदे सिद्धार्थ कांबळे संजय इंगले अस्मिता पाटिल आदि महिला मोटया संखेने उपस्थित होत्या
