संगमनेर । झुंजार न्यूज

संगमनेर बसस्थानकात किरण किसन आहेर रा.लोणी ता.राहाता याने नाशिक येथील एक युवतीशी व्हाटसप च्या माध्यमातुन ओळख केली तो तिला दररोज व्हाटसप मेसेज करायचा तो त्या युवतीला म्हणाला मी लोणी गावाचा पाटील आहे. माझ्या शिर्डी येथे शाळा, कॉलेज आहे त्यावेळेस मला नौकरी ची आवश्यकता असल्याने युवतीने मला आपल्याकडे नौकरी मिळेल का अशी विचारणा केली.

 

त्यावेळी किरण म्हणला माझ्या शाळेत नौकरी लावुन देतो किंवा संगमनेर मध्येच तुला एका हॉस्पिटल ला नौकरी लावुन देतो. तु फक्त संगमनेर ला भेटायला ये तुला संगमनेर मध्येच नौकरीचे ठिकाण दाखवुन देतो युवतीला नौकरीची गरज असल्याने ती दि.२६ जुलै २३ रोजी दु ४.०० वा नाशिक वरुन संगमनेर बसस्थानकावर पोहचली तेथे किरण आहेर व युवतीची भेट झाली त्याने युवतीचा नौकरीचा विषय बाजुला ठेऊन तिच्या गरिब परिस्थितीचा गैरफायदा घेत युवतीशी बसस्थानकातचं अमृततुल्य येवले चहा च्या समोर असभ्य वर्तन करायला सुरवात केली. किरण आहेर युवतीला म्हणाला माझ्या गाडीमध्ये बस परंतु युवतीने गाडीत बसण्यास नकार दिला त्यावेळेस तो तिला म्हणाला मला तु खुप आवडतेस आपण एखाद्या हाॅटेल वर जाऊ, तु इतकी छान दिसते की तुला जाॅब करण्याची चं गरज नाही मी तुला पैसे देत जाईन फक्त मी जेव्हा बोलवेल तेव्हा संगमनेर ला येत जा, नाहितर मी नाशिक ला येत जाईल. त्यानंतर किरण ने युवतीचे त्याच्या मोबाईलवर फोटो काढले त्यावेळी युवतीला राग आला त्याने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले त्यावेळेस युवतीची व किरणची झटापट झाली त्यामुळे बसस्थानकात आजुबाजुला असलेल्या प्रवाशी व नागरिकांच्या ही बाब लक्षा आली. त्यांनी किरण ला चोप दिला त्याच्या पासुन युवतीची सोडवणुक केली. व त्याला पकडुन ठेऊन सदर घटनेची माहिती संगमनेर शहर पोलीस यांच्याकडे दिली त्यावेळी पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले व किरण आहेर यास त्यांनी ताब्यात घेतले.

 

युवतीच्या फिर्यादीवरून रात्री उशीरा संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा र.नं.६२८ /२०२३ नुसार भा.द.वि.क ३५४ A ,३५४ D नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास संगमनेर शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडून सुरु आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *