अकोले । झुंजार न्यूज

 

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला अखेर ठरला असून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. भाजपच्या  वाट्याला 6, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 3 आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागा असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यात रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षालाही एक जागा मिळावी अशी मागणी राज्याचे उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी केली आहे .

अधिवेशनानंतर नेत्यांमध्ये चर्चा होवून राज्यपालांना यादी पाठवली जाणार असल्याने रिपब्लिकन पक्ष हा सातत्यांने भाजपा बरोबर असून यापक्षाला एक जागा मिळणे स्वाभाविक असून अधिवेशनानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपाईचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून चर्चा करणार आहे . 

रिपाई पक्ष हा भाजपाबरोबर आघाडीमध्ये असून राज्यात शासकिय – निमशासकिय ठरावानुसार सत्तेच्या व निवडणुकीच्या प्रवाहात रिपाई १० % वाटा देण्याचे ठरलेले आहे त्यानुसार राज्यपाल नियुक्त आमदारात १ जागा तर मंत्री मंडळ विस्तारात एक कॅबिनेट तर एक राज्य मंत्री पद हवे असून यांची तरतुद भाजपाला करावीचं लागणार आहे तर भविष्यात होणाऱ्या निवडणुकामधून कार्यकर्त्याना निवडणुक लढविण्याची संधी उपलब्ध करुन देणात येणार असल्याने सामाजिक दायित्वातून कार्यकर्त्यानी कामे करावी असे आवाहन वाकचौरे यांनी केले .

 

चौकट

 

आता पर्यत सत्तेच्या प्रवाहात अनेक जिल्ह्यातील रिपाईच्या कार्यकर्त्याला मंत्री , आमदार होण्याची संधी मिळाली रिपाई स्थापने पासून अहमदनगर जिल्हयात अदयाप संधी मिळाली नाही आता राज्यपाल नियुक्त आमदार होण्याचे अहमदनगर करांचे स्वप्न निश्चित पूर्ण होणार अशी अपेक्षा आहे 

 

विजयराव वाकचौरे ( उपाध्यक्ष , रिपाई महा राज्य )

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *