मुंबई । झुंजार न्यूज

 

नाशिक येथील बीएड सीईटी परीक्षेदरम्यान परीक्षा आयोजकांनी हलगर्जीपणा केला आणि विद्यार्थ्यांचे वसतीगृह ऐनवेळी बदलण्यात आले, त्याबाबत शासनाने कोणती कारवाई केली, असा प्रश्न आ. सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत विचारला.

 

त्याला उत्तर देताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की,नाशिक जिल्ह्यातील पाच परीक्षा केंद्रांपैकी दोन परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचण झाल्यामुळे दोन परीक्षा केंद्र परीक्षेच्या दोन दिवस आधी बदलण्यात आले. विद्यार्थ्यांना यासंबंधीची माहिती फोन व एसएमएसद्वारे देण्यात आली होती. मूळ परीक्षा केंद्रावरील उमेदवारांना नवीन परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी सेवा पुरवठादारामार्फत गाडीची व्यवस्था आणि उशिरा आलेल्या उमेदवारांना परीक्षेचा वेळ वाढवून देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *