संगमनेर । झुंजार न्यूज
निळवंडे धरणाचे पाणी उजव्या व डाव्या कालव्यामधून शेतकऱ्यांना मिळावे हा ५० – ६० वर्षाच्या संघर्ष आता संपला डाव्याप्रमाणेचं आता उजव्या कालव्यांची चाचणी होवून सहाचं महीन्यात या कालव्याद्रारे पाणी दिसेल असा विश्वास खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केला .
संगमनेर तालुक्यातील पुर्व भागाकडील निळवंडेच्या कालव्यांच्या कामाची पाहणी करिता पानोडी येथे खा . लोखंडे आले होते यावेळी लोकांशी संवाद साधताना खासदार लोखंडे बोलत होते .
यावेळी कालव्यांचे काम अगदी ठिम्या गतीने होत असून पाणी कधी येईल अशा शंका लोकांनी उपस्थित केल्या . बहुतांश पुलाचे , कालव्यांच्या खोंदणीकरण व सेतू अपूर्ण असल्याने कामे कधी होईल यांची शाश्वतीचं राहिली नाही डाव्या कालव्यांची चाचणी करुन त्याला पाणी सोडले मग उजव्या कालव्यांचे काय हा भेदभाव का ? अशा एक ना अनेक प्रश्न यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केले होते .
यावेळी निळवंडे प्रकल्पाचे अभियंता प्रमोद माने , सोसायटी चेअरमन बबन कराड , सात्यकी थोरात , शंकर तात्या जाधव , बाळू पाटील नागरे , अलिमभाई सय्यद , रोहीदास घुगे , सानप , देवराम हजारे , बाबुराव जाधव , विठ्ठल घोडेकर , पांडूरंग साबळे आदीसह मोठया संख्येने ग्रामस्थ , आधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते .
Post Views: 701
