पक्षनेतेपदी फेरनिवड झाल्याबद्दल आमदार थोरात यांचा सत्कार
संगमनेर । झुंजार न्यूज
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे आमदार थोरात यांचा पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे ज्येष्ठ नेते बाजीराव पा. खेमनर, सौ दुर्गाताई तांबे, डॉ जयश्रीताई थोरात , शंकरराव खेमनर,रामहरी कातोरे ,मिलिंद कानवडे, संतोष हासे ,आर.बी. राहणे, निखिल पापडेजा, सुधाकर जोशी, नवनाथ आरगडे, अजय फटांगरे ,सौ सुनंदाताई जोर्वेकर ,सौ अर्चनाताई बलोडे, सौ निर्मलाताई गुंजाळ, सुनंदाताई दिघे, राजेंद्र चकोर, सिद्धाराम दीडी, सुहास आहेर, उबेद शेख, संपतराव गोडगे, सोमेश्वर दिवटे,ऋतिक राऊत, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, अनिल शिंदे, आदींसह अमृत उद्योग समूहातील व संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्षाला मोठी त्यागाची व बलिदानाची परंपरा असून या पक्षाने सर्वसामान्यांच्या विकासासाठी कायम काम केले आहे. आपण कधीही पदाला महत्त्व दिले नसून जनतेच्या कामांना प्राधान्य दिले आहे. पक्षातील सर्वांना बरोबर घेऊन काम केले. जनतेचे प्रेम व नेतृत्वाचा विश्वास यामुळे राज्यात काम करण्याची मोठी संधी मिळाली. या संधीचा उपयोग हा कायम सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आपण केला आहे. आपल्या तालुक्याचा,सहकार, शिक्षण, ग्रामीण विकास, सुसंस्कृत राजकारणाची परंपरा कार्यकर्त्यांची मोठी फळी हे आपले वैशिष्ट्य आहे .यामुळे संगमनेर तालुक्याचे नाव संपूर्ण देशात आज आदराने घेतले जात आहे..
सध्याचे फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्रातील जनतेला मान्य नसून अशा राजकारणाबद्दल जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे. काँग्रेसने कायम सुसंस्कृत राजकारण केले असल्याने जनसामान्यांमध्ये या पक्षाबद्दल मोठी आस्था असून आगामी काळात काँग्रेस पक्षाला मोठे भवितव्य आहे.
या पक्षात तरुणांना मोठी संधी असून देशांमध्ये परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे .2024 मध्ये देशात आणि राज्यात नक्कीच काँग्रेस पक्ष क्रमांक एकचा असेल असे सांगताना महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवरील असेही आमदार थोरात यांनी म्हटले आहे.
तर माजी आमदार डॉ तांबे म्हणाले की ,आमदार बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान सैनिक आहे .अत्यंत अडचणीच्या काळामध्ये त्यांनी पक्षाचे नेतृत्व करताना पक्षाला मोठे यश मिळवून दिले. महाविकास आघाडी बांधण्यात ही आमदार थोरात यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. राज्यातील सर्व आमदारांचे नेतृत्व करताना त्यांनी संगमनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले आहे. पक्षाने जी जबाबदारी दिली ती यशस्वीपणे पार पाडणारे आमदार थोरात यांना जनतेच्या व नेतृत्वाच्या आशीर्वाद असल्याने आगामी काळात राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल असे ही डॉ तांबे यांनी म्हटले आहे .यावेळी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांचे सह विविध कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे यांनी आभार मानले..
