संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण स्कूलच्या विद्यार्थ्यींनी टाकाऊ वस्तू पासून बनविलेल्या राखीचा देशाचे महान क्रिकेटपटू शिखर धवन यांनी स्विकार करत विद्यार्थ्यींनीचे व बालपण स्कूलचे कौतुक केले .
टाकाऊ पासून टिकाऊ या उपक्रमांतर्गत पर्यावरण पूरक राख्या बालपण स्कूलच्या विद्यार्थ्यींनीनी बनवून भारतातील पर्यावरणावर काम करणाऱ्या विविध संस्था व व्यक्तींना पाठविण्यात आल्या. सर्वांनी पर्यावरण पूरक राखीचा स्विकार केला. त्यातील विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू शिखर धवन सर यांनाही धनश्री विजय जोरी या १० वी च्या विद्यार्थ्यींनीची राखी सरांना पाठवली आणी सरांनी राखी सोबत विद्यार्थ्यींनीने पाठविलेल्या संदेशासोबतचा फोटो पाठवत बालपण स्कूल पानोडी च्या या उपक्रमाचे कौतुक केले.
या वर्षी विद्यार्थ्यींनींनी पर्यावरण पूरक टाकाऊ वस्तूंपासून राख्या बनवून शाळेच्या आवारातील झाडांना व पोलीस बांधवांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा केला. या उपक्रमासाठी बालपण स्कूल पानोडी चे सर्व शिक्षक वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच बालपण च्या प्रमुख सौ. सोनाली मुंढे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला.
Post Views: 958
