कोपरगाव । झुंजार न्यूज

प्रज्वल उदय संवत्सरकर हे अभियांत्रिकी पदवीधारक असून ते दोन वर्षांच्या उच्च शिक्षणासाठी जर्मनी येथे नुकतेच रवाना झाले आहेत, तालुक्यातील संवत्सर येथील माजी ब्रांच पोस्ट मास्तर शशिकांत संवत्सरकर यांचे ते नातू तर क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीचे सरव्यवस्थापक उदय संवत्सरकर यांचे ते चिरंजीव होत.
             
चिरंजीव प्रज्वल संवत्सरकर हे दहावी, बारावी परीक्षेत सर्वप्रथम आले होते, त्यानंतर त्यांनी मुंबई येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. तेथूनच त्यांची दोन वर्ष जर्मनीला उच्च शिक्षणासाठी निवड झाली. प्रज्वलचे वडील उदय संवत्सरकर हे देखील अत्यंत हुशार व मेहनती आहेत त्यांनी देखील दहावी परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले होते.
प्रज्वलला उच्च शिक्षणासाठी खासदार सदाशिव लोखंडे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार आशुतोष काळे, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, गायन परीक्षक दीपक कुलकर्णी, प्राजक्ता कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष रवींद्र पाठक, नायब तहसीलदार श्रीमती. सातपुते, डॉ. विलास आचारी, माजी सभापती कारभारी परजणे, माजी पंचायत समिती सदस्य कृष्णा परजणे, उपसरपंच विवेक परजणे, बाजार समितीचे संचालक खंडेराव फेफाळे, तलाठी श्री. लहाने, शिंगणापूर, कोपरगाव पोस्ट विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, कोल्हे कारखान्याचे माजी कर्मचारी बापूतात्या परजणे, एस. एल. परजणे, लक्ष्मण साबळे, चंद्रभान करपे, दत्तात्रय बाराहाते, सचिन वरगुडे, मंगेश सोनवणे, संवत्सर सोसायटीचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, पंचक्रोशीतील सर्व हितचिंतक आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *