संगमनेर । झुंजार न्यूज
पर्यावरण संवर्धनाचे संस्कार घेऊन काम करत असलेल्या शिबलापूर येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनींनी टाकाऊ वस्तु पासून बनवलेल्या पर्यावरण पूरक राख्यांचे माजी शिक्षण मंत्री आमदार बाळसाहेब थोरात यांनी कौतुक केले असून या चिमुकल्या विद्यार्थिनींनी आमदार थोरात यांना राख्या बांधल्या.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी माजी शिक्षणमंत्री लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांना राख्या बांधल्या. यावेळी समवेत प्राचार्य गफार शेख यांसह शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनाचे बाल संस्कार मिळालेल्या या विद्यार्थिनींनी अनेक टाकाऊ वस्तूंपासून विविध टिकाऊ वस्तू बनविल्या आहेत. यापैकीच केलेल्या पर्यावरण पूरक राख्या ह्या लक्षवेधी ठरल्या आहेत. या राख्या घेऊन या चिमुकल्या विद्यार्थिनींनी लोकनेते आमदार थोरात यांची भेट घेतली व त्यांच्या हातावर राख्या बांधल्या. हा अत्यंत स्तुत्य उपक्रम पाहून आमदार थोरात यांनी या बाल गोपाळांचे कौतुक केले.
याप्रसंगी आमदार थोरात म्हणाले की, पर्यावरण संवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे असून लहान मुलांना मिळालेले हे संस्कार अत्यंत कौतुकास्पद आहे. सह्याद्री शिक्षण संस्थेने गुणवत्ता जपण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम केले आहे.
शिबलापूर सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी टाकाऊ वस्तु पासून बनवलेल्या टिकाऊ वस्तू मोठ्या प्रमाणात वापरात येणार आहे. प्लास्टिक बंदी सह पर्यावरण संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. हेच काम या चिमुकले विद्यार्थी पर्यावरण दूत म्हणून करत असल्याचीही ते म्हणाले.
आमदार थोरात यांची भेट घेतल्यानंतर या सर्व चिमुकल्या विद्यार्थिनीं आनंदाने भारावून गेल्या होत्या
