संगमनेर । झुंजार न्यूज
सदर पुरस्काराचे वितरण पुणे येथील महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था येथे आयोजन
करण्यात आले. सेंटर ऑफ एक्सलन्स प्रमाणपत्र स्वीकारताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, डॉ. सकळकळे, अहमदनगर जिल्हा समन्वयक व महाविद्यालयीन समन्वयक प्रा. नवनाथ नागरे, महाविद्यालयीन समन्वयक प्रा. संतोष खामकर यांनी सन्मानपत्र स्वीकारले. यापूर्वीही याउपक्रमात उत्तम नियोजन आणि त्याद्वारे झालेली विद्यार्थ्यांची स्पर्धापरीक्षा मधील यश लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने करिअर कट्टा उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयाला राज्यस्तरीय पाच पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
ही संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्यादृष्टीने अभिमानाची बाब आहे. यायशाबद्दल माजी महसुल मंत्री मा. आ. बाळासाहेब थोरात साहेब, सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे चेअरमन मा. आ. डॉ. सुधीरजी तांबे साहेब, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, संस्थेचे सचिव मा. लक्ष्मणराव कुटे, सहसचिव मा. दत्तात्रय चासकर, रजिस्ट्रारमा. बी. आर. गवांदे, सर्व संचालक, कार्यालयीन अधीक्षक श्री.जी. एन. पानसरेतसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.
