संगमनेर । झुंजार न्यूज

 

शहरातील शैक्षणिकदृष्ट्या नामांकित असलेल्या आणि संगमनेर चाळीसक्रोशीत गौरवाकिंत ठरलेल्या ज्ञानमाता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात २०२३ हे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करीत असताना १ ऑक्टोबर २०२३ सकाळी ९:०० माजी विद्यार्थी स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य रेव्हरंड फा.जेम्स थोरात यांनी दिली

ज्ञानमाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शैक्षणिक वर्षे म्हणून साजरे करीत असताना या निमित्ताने सन २०१५ पुर्वीच्या इ.१०वी इ.१२ वीच्या सर्व विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला आहे तरी विद्यालयाच्या सर्व आजी माजी विद्यार्थी, विद्यार्थीनींनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य रेव्हरंड फा.जेम्स थोरात यांनी केले आहे.हा मेळावा यशस्वीतेसाठी व्यवस्थापक रेव्हरंड फा.आबा वाघमारे,पर्यवेक्षक आर .इ . गायकवाड , उपप्राचार्य के.डी.भोसले,आदी शिक्षक प्रयत्नशील आहेत.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *