संगमनेर । झुंजार न्यूज
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गुणवत्तेमुळे देशात अग्रगण्य ठरलेल्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा मूलमंत्र देण्याकरता 1000 रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांपासून श्री गणेश मूर्ती तयार करून तिची स्थापना केली आहे .
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अमृत कला मंच येथे या विद्यार्थ्यांनी श्री गणेशाची स्थापना केली. यामध्ये राजहंस एक्वाच्या १००० रिकाम्या बाटल्यांपासून श्री गणेशाची आकर्षक मूर्ती तयार केली आहे .याचबरोबर चंद्रयान मोहिमेचा देखावा अवकाशातील ध्रुव, तारे हेही लक्षवेधी ठरत आहेत. या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीला संस्थेच्या विश्वस्त सौ . शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम ए वेंकटेश, रजिस्टर प्रा विजय वाघे यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
याप्रसंगी सौ.शरयूताई देशमुख म्हणाल्या की,अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचा परिसर हा स्वच्छ व हिरवाईने नटलेल्या परिसर म्हणून राज्यात ओळखला जात आहे. प्रवेशद्वारापासून असलेली बांबूचे बेट आणि संस्थेच्या परिसरात सुमारे एक लाख वृक्ष यामुळे हा परिसर अत्यंत निसर्गरम्य झाला आहे .याचबरोबर सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात असून टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवण्याचे संस्कार या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी हा पर्यावरण पूरक गणपती बनवला आहे. यामध्ये 1000 रिकाम्या बाटल्या असून आकर्षक गणेश मूर्ती तयार झाली आहे. याचबरोबर भारताने राबवलेल्या चंद्रयान मोहिमेचे दर्शनही या देखाव्यातून होत आहे
अनिल शिंदे म्हणाले की,काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच गुणवत्ता विकास वाढ हा कार्यक्रम सातत्याने राबविला जात आहे . या विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तु पासून तयार केलेल्या टिकाऊ गणपती हे इतरांसाठी पर्यावरण संवर्धनाचा मंत्र देणारे ठरणार असल्याचेही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या या कल्पकतेचे व तयार केलेल्या गणपती देखाव्याचे संस्थेचे प्राचार्य व सर्व विभाग प्रमुख ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे
