औरंगाबाद । झुंजार न्यूज
औरंगाबाद जिल्ह्यामधील एका शालेय कार्यक्रमात राज्याचे शिक्षण मंत्री ना . दिपक केसरकर यांच्या हस्ते कन्नड येथील जिल्हा परिषद प्रशाळाचे मुख्याध्यापक श्री डी एच गायकवाड यांना कौस्तुभ दिगांवकर लिखित ‘ मराठावाडा मुक्ती गांथा हे पुस्तक देवून सन्मानित करण्यात आले .
या कार्यक्रमासाठी औरंगाबाद पश्चिम मतदार संघाचे आमदार माननीय संजयजी शिरसाट, शिक्षण उपसंचालक माननीय श्री अनिलजी साबळे, शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री एम के देशमुख साहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती जयश्री चव्हाण मॅडम, समग्र शिक्षा अभियानाची प्रोग्राम ऑफिसर माननीय श्री डॉक्टर जैन सर व इतर मान्यवर उपस्थित होते .
