संगमनेर । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पठार भागाच्या वरवंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतेच हिंदुस्तान फीड्स पशुखाद्य या कंपनीच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

 

प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पांडुरंग वर्पे होते सदर कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ.कविता संपत भोसले, सदस्या सौ.प्रमिला भोसले,प्रमोद शिंदे,रेवणनाथ वर्पे,मच्छिंद्र वर्पे,प्रवरेचे प्राचार्य जगदीश मुंतोडे,रोहिदास वाडेकर,ऋषीकेश काळे आदी मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमासाठी सावली सर्विसेसचे अधिकृत विक्रेते सत्यजित वाडेकर यांनी विशेष प्रयत्न केले.हिंदुस्तान फिड्स पशुखाद्य कंपनीतर्फे रविंद्र पवार ,नितीन ननवरे,डॉ.केतन पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. रविंद्र पवार यांनी दुधाचे अन्नातील महत्त्व तसेच शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाचे महत्व सांगितले. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरवंडी शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण दिघे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास वर्पे यांनी केले तर आभार निलेश हारदे यांनी मानले.सदर कार्यक्रम प्रसंगी शिक्षक श्री.अनारसे ,अर्जुन दातीर ,श्रीमती सुवर्णा गायकवाड उपस्थित होत्या.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *