संगमनेर
श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय येथे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा पार पडल्या असून विविध मैदानी स्पर्धांमधून अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती प्राचार्या शितल गायकवाड यांनी दिली आहे.
संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास व्हावा यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे विद्यालयाचे विद्यार्थी विविध क्षेत्रात अति उत्तम कामगिरी करून विद्यालयाचे नाव रोशन करत आहे. या वर्षांमध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपली चुणूक दाखवून अथांग परिश्रमाच्या मदतीने यश निश्चित केले.सदर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ४ x १०० मीटर रिले मध्ये 14 वर्ष मुले या गटात चिरंजीव महादू गायकवाड, हर्षद मोनी राम कवर, नरेंद्र मनोहर वाघमारे, हिमेश प्रकाश जाधव व करण शिवराम दळवी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
याचबरोबर उन्मेष मनोहर चौधरी यांनी 100 मीटर धावणे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला.तसेच 400 मीटर धावणे स्पर्धेत गणेश हिरामण बागुल यांनी तृतीय क्रमांक मिळविला. 1500 मीटर धावणे स्पर्धेत जयेश प्रकाश तुंगार याने द्वितीय क्रमांक मिळविला. व 3000 मीटर धावणे स्पर्धेत 17 वर्षे मुले या गटात चौधरी विकास ताराचंद यांनी तृतीय क्रमांक मिळविला. गोळा फेक मध्ये प्रणव प्रकार जाधव यांनी द्वितीय क्रमांक मिळविला व 5 किलोमीटर चालणे 17 वर्षे मुले या प्रकारात गावित सुमित महिंद्र यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच 19 वर्षे मुले वयोगटात 5 किलोमीटर चालले या स्पर्धेत सार्थक नितीन हरडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.सदर स्पर्धेत विद्यालयातील वरील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून विद्यालयाच्या शिरपेचातआणखी एक मानाचा तुरा रोवला व जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी आपली निवड निश्चित केली. त्या यशस्वी विद्यार्थ्यांचे क्रीडा शिक्षक हेमंत कुमार पंधारे, रवींद्र कदम, वैष्णवी जाधव तसेच वृषाली भागवत यांचे मार्गदर्शन लाभले.
या विद्यार्थ्यांच्या निवडीचे अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, संस्थेचे विश्वस्त आमदार डॉ सुधीर तांबे ,उपाध्यक्ष बाळासाहेब गुंजाळ पाटील, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे ,संस्थेच्या विश्वस्त शरयूताई देशमुख, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्राचार्य व्हि.बि.धुमाळ, प्राचार्या शीतल गायकवाड,सर्व विभाग प्रमुख व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केलेव पुढील स्पर्धेसाठीशुभेच्छा दिल्या
