निडो इंटरनॅशनल स्कूल मध्ये एआयआर कार्यक्रम
संगमनेर । झुंजार न्यूज
अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूल मध्ये आर्टिस्ट इन रेसिडेन्सी या उपक्रमांतर्गत महाराष्ट्राची संत परंपरा ही नाटिका राबवली जात आहे.महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा असून एकात्मतेचा व समतेचा संदेश देणाऱ्या या संतांची जीवन पद्धती समजून घेत त्याचे अनुकरण करावे याकरता हा उपक्रम राबवला जात आहेत.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगे महाराज, संत मीराबाई, संत जनाबाई या संतांचे फक्त अभंग पाठ न करता त्यांचा उपदेश आत्मसात करून प्रत्यक्ष काम विद्यार्थी करणार आहेत. जसे संत गाडगे महाराजांनी स्वच्छतेचा मंत्र सर्वांना दिला तसेच प्रत्येक विद्यार्थी यापुढे स्वतःच्या घरात शाळेत व समाजातही स्वच्छतेसाठी काम करणार आहेत.
संतांची शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा हा अभिनव उपक्रम सुरू असून यामधून हे चिमुकले विद्यार्थीच त्या कार्यक्रमाची ड्रेपरी, लाईट व्यवस्था, एडिटिंग, स्टेज, कथालेखन ,संवाद लेखन, नृत्य असे सर्व कामे करत आहेत. शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता निडो इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात हा कार्यक्रम सादर होणार आहे .त्याचप्रमाणे युरोप टेक्नॉलॉजीतून नृत्य दिग्दर्शित एन सी हा भारतातील पहिला कार्यक्रमही इयत्ता आठवी ते दहावीचे मुले सादर करणार आहेत.
यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात मा.आमदार डॉ सुधीर तांबे विश्वस्त सौ. शरयू ताई देशमुख यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमासाठी सर्व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे व प्राचार्य अंजली कन्नवार यांनी केले आहे.
