संगमनेर । झुंजार न्यूज
तळेगाव दिघे स. ब. वि. प्र. समाजाचे लोकनेते बाळासाहेब थोरात कला वाणिज्य .व विज्ञान महविद्यालयाने रायफल व पिस्तूल शूटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवळला असल्याची माहिती प्राचार्य. डॉ. डी डी पवार यांनी दिली आहे.
एलआयसी ६७ वर्धापणदिनानिमित्त डी के स्पोर्ट्स क्लब लोणी येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन एल आय सी विकास अधिकारी सुनील हसणले यांनी केले या स्पर्धेत लोकनेते बाळासाहेब थोरात महविद्यालयातील संघाने भाग घेतला. यात टीवायबीए या वर्गातील विद्यार्थीनी कु. तनुजा शिवाजी गुडघे हिने रायफल शूटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. गोल्ड मेडल आणि सन्मान चिन्हाने तिला गौरवीत करण्यात आले . द्वितीय क्रमांक (पिस्तूल स्पर्धेत) सोनाली दत्तू दिघे हिने सिल्व्हर चिन्ह पटकावले. तृतील क्रमांक PSR क्रीडा प्रकारात मनीषा भय्यालाल विश्वकर्मा हिने कास्यपदक व सन्मानपत्र मिळवले. मुलांमध्ये आदित्य राजेंद्र दिघे याने ओपन साईड एअर रायफल क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक सन्मान मिळवून गोल्ड मेडल व सन्मान मिळवले.
या सर्व यशस्वी खेळाडूचे संस्थेचे आमदार बाळासाहेब थोरात, संस्थेचे अध्यक्ष मा आमदार डॉ सुधीर तांबे, सचिव लक्ष्मणराव कुटे, सह सचिव मा दत्तात्रय चासकर, रजिस्टर बी. आर. गवांदे, महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. पवार उपप्राचार्य आर. व्ही. पानसरे क्रीडा शिक्षक प्रा. दीपक रणपिसे आणि सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवकांनी कौतुक केले.
