डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू,शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

अकोले । झुंजार न्यूज

निळवंडे धरणातील पाण्यावर अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचा असलेला हक्क आणि अधिकार आबाधित ठेवूनच सर्व निर्णय होतील त्यामुळे पाण्याच्या बाबतची कोणतीही भीती बाळगू नका असे आश्वासित करून डाव्या कालव्या प्रमाणेच उजव्या कालव्यांची तांत्रिक काम पूर्ण करून येत्या ३० आॅक्टोबर रोजी पाणी सोडण्याची घोषणा महसूल तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे यांनी केली.

 

निळवंडे धरणातून डाव्या कालव्यात शनिवारी पाणी सोडण्याची घोषणा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती.या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी पूर्ण करावी आशी मागणी करून धरण स्थळावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

मंत्री विखे पाटील यांनी धरण स्थळावर येताच थेट आंदोलनकर्त्या शेतकर्यांमध्ये जावून त्यांची भूमिका समाजावून घेतली.माजी आमदार वैभवराव पिचड काॅ अजित नवले जिल्हा बॅकेचे संचालक अमित भांगरे मीनानाथ पांडे वसंत मनकर शिवाजी धुमाळ श्रीमती सुनिता भांगरे यांच्या शेतकरी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले की,उजव्या कालव्यांची काम बहुतांशी पूर्ण झालेली आहेत.राहीलेली तांत्रिक काम पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देतो.अधिकची मशिनरी उपलब्ध करून काम पूर्ण करून तीस आॅक्टोबर रोजी सोडण्यास मी स्वता येईल डाव्या कालव्याला पाणी सोडल्याने उजव्या कालव्याच्या चाचणीला पाणी शिल्लक राहाणार नाही ही भीती मनातून काढून टाका चुकीची माहीती समोर आली असून आकडेवारीसह मंत्री विखे यांनी खुलासा केला.

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रांताधिकारी तसेच जलसंपदा विभागागाने तातडीने प्रयत्न करावेत.यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांचा तातडीने पाठपुरावा करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या सातबारा उतार्यावर भूसंपादनाचे अजूनही असलेले शेरे कमी करून देण्याबाबतची कार्यवाही तहसिलदारांनी तात्काळ पूर्ण करण्यास तसेच तालुक्यातील आणेवारी बाबतही पुनहा आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी प्रांताधिकारी यांना दिल्या.

यासर्व प्रश्नाबाबत पुढील आठवड्यात बैठक घेवून आढावा घेणार तसेच उजव्या कालव्यांची सुरू असलेली काम पाहाण्यासाठी स्वता येणार याबाबत सकारात्मक चर्चा करून मंत्री विखे पाटील यांंनी आंदोलनकर्त्याचे समाधान केले.

मंत्री विखे पाटील म्हणाले की,जिल्ह्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी राहील्याने दुष्काळी परीस्थीती निर्माण झाली आहे.डाव्या कालव्याला पाणी सोडण्यामुळे थोडासा दिलासा शेतकऱ्यांना मिळेल.आपल्या भागात दूधधंदा मोठा असल्याने जनावाराच्या चार्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.

समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे नगर नासिक आणि मराठवाड्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.मात्र यासाठी सर्वानी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

काॅ अजित नवले यांनी मंत्री विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनावर समाधान व्यक्त करून अकोले तालुक्यातील प्रश्नसाठी पालकत्व स्विकारण्याची विनंती केली. मीनानाथ पांडे श्रीमती सुनिता भांगरे वसंतराव मनकर यांच्यासह जलसंपदा विभागाचे अभियंता शेटे या चर्चेत सहभाग घेतला.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed