संगमनेर । झुंजार न्यूज  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात भक्कम विकासात्मक सरकार उभे असून गोरगरिबाकरिता आयुष्यमान भारत , पंतप्रधान घरकूल , मोफत अन्नधान्य यांच्यासह अनेक योजना अंमलात आणल्या असून भाजपा सरकार हे गोरगरिबांचे कल्याणकारी सरकार असल्याचे प्रतिपादन माजी जि प अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी केले .

संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील प्रतापपूर गावात दिवाळी निमित्ताने विखे कुटुबियाकडून प्रत्येक कुटुबांस ५ किलो साखर वाटपप्रसंगी सौ विखे पाटील बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसंरपच सुखदेव गंगाराम आंधळे पा हे होते 

यावेळी विखे पाटील ट्रक सोसायटी माजी संचालक भगवान दादा इलग , संरपच पांडूरंग आंधळे , माजी संरपच दत्तात्रय आंधळे , तंटा मुक्ती अध्यक्ष बाळासाहेब सांगळे , सोसायटी चेअरमन गजानन आव्हाड , व्हाचेअरमन संखाराम आंधळे , मुरलीधर पाटील आंधळे ,  पोलिस पाटील विठ्ठलराव आंधळे , ट्रक सोसायटी संचालक शिवाजीराव इलग , उपसंरपच सौ आंधळे , रंगन्नाथ आंधळे , रभाजी इलग , बाळासाहेब आंधळे , बाळासाहेब आंधळे , कचेश्वर आंधळे आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .

यावेळी सौ विखे पाटील पुढे म्हणाले की , जिल्हयामध्ये विलांग , गोरगरिबांसह विविध समाज्यातील लोकांकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून डॉ सूजय विखे पाटील यांनी राबविल्याने अनेकांना यांचा फायदा मिळाला . शिर्डी मतदार संघातील लोकांनी विखे पाटील परिवारावर सातत्याने प्रेम केले विश्वास दाखविला . त्यामाध्यमातून लोकाकरिता विविध उपक्रम राबवून लोकांचे अडी अडचणी समाजावून घेणे हे आमचे कर्तव्यचं असे विखे पाटील म्हणाले .

प्रास्ताविक भगवानराव इलग पाटील यांनी केले 

चौकट 

सर्व सामान्य व गरिब माणसाची दिवाळी गोड व्हावी म्हणून विखे परिवाराकडून शिर्डी मतदार संघातील प्रत्येक कुटुबांला भेद भाव न करता ५ किलो साखर वाटप करण्यात आल्याने पुन्हा एकदा , सर्वसामान्य ,गोरगरिब , कष्टकर्‍याबाबत तळमळ दिसून आल्याचे चित्र दिसले 
भगवानराव इलग ( माजी संचालक , ट्रॅक सोसायटी प्रवरानगर ) 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *