मुंबई । झुंजार न्यूज

 

क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपटाचा प्रीमियर शो आज नाशिक येथील सिटी सेंटर पिव्हीआर चित्रपटगृहात पार पडला. या प्रीमियर शोला उपस्थित राहून संपूर्ण चित्रपट पहिला. चित्रपट पाहताना मी अक्षरशः भावूक झालो होतो. कारण महात्मा फुले यांचा जीवनपट आणि त्यांचं कार्य अतिशय उत्तम पद्धतीने या चित्रपटातून मांडण्यात आलं आहे. दि .५ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. तरी महाराष्ट्रातील जनतेने आवर्जून हा चित्रपट पहावा, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगनराव भुजबळ यांनी आहे.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना महात्मा फुले यांचे विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सत्यशोधक चित्रपट महाराष्ट्र शासनाच्या वतीने लवकरच टॅक्स फ्री करण्यात येईल, अशी घोषणा केली. तसेच महात्मा फुले यांचं कार्य आणि त्यांचे विचार जनतेपर्यंत नेण्यासाठी प्रत्येक विषय घेऊन चित्रपट काढावे लागतील, असं मत मांडलं. महात्मा फुले यांचा लढा कुठल्याही धर्माविरोधात किंवा ब्राम्हणांविरुद्ध नव्हे, तर ब्राम्हण्यवादाच्या विरोधात होता. इतिहास जाणून घेण्यासाठी आणि समाजसुधारकांचे विचार तळागाळात पोहचविण्यासाठी सत्यशोधक चित्रपट अतिशय प्रभावी आणि परिणामकारक असून महाराष्ट्रभरातील सर्वांनी हा चित्रपट पाहावा,असे भुजबळ आवाहन केले.

अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी महात्मा जोतीराव फुले यांची, तर राजश्री देशपांडे यांनी सावित्रीमाईंची भूमिका अतिशय सुरेख साकारली आहे. तसेच निलेश जळमकर यांचे लेखन आणि दिग्दर्शनही अतिशय उत्तम आहे. या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत, तसेच चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक व सहकलाकारांचा सत्कार केला.

याप्रसंगी चित्रपट निर्माते आप्पासाहेब बोराटे,सहनिर्माते शिवा बागुल,सहकलाकार माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्यासह विविध कलाकार,पदाधिकारी व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *