जाणता राजा मैदानावर श्री वल्लीचा जल्लोष होणार
संगमनेर । झुंजार न्यूज
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जयंती महोत्सवात आज गुरुवार दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 7 वा. बॉलिवूडमधील आघाडीचा गायक पुष्पा फेम जावेद अली यांचा लाईव्ह कॉन्सर्ट जाणता राजा मैदानावर होणार आहे.

खास तरुणाईच्या आग्रहास्तव बॉलीवूडमधील आघाडीचा गायक जावेद अली यांच्या लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये हिंदी मराठी चित्रपटात गीता सह सुफी गीतांची बहारदार मैफिल होणार आहे. पुष्पा मधील श्री वल्ली हे लोकप्रिय गाणे तरुणाईच्या ओठावर आहे. तर इशकजादे, कजरारे, गुजारिश ,तू ही हकीगत जशने बहारा हे लोकप्रिय गीते जावेद अली यांनी गायली आहेत.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातवाडी ते क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त जाणता राजा मैदानावर भव्य जर्मन हंगर पद्धतीने मंडप उभारण्यात आला असून 60 बाय 60 चे भव्यदिव्य स्टेज आहे. एलईडी स्क्रीन, अद्यावत लाईट व्यवस्था ,साऊंड सिस्टिम, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था ,पार्किंग व्यवस्था अशी आधुनिक सुविधा करण्यात आली आहे. श्री वल्ली या गाण्याने जाणता राजा वर मोठा तरुणाईचा मोठा जल्लोष होणार आहे.
या कार्यक्रमासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे ,कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात ,सौ दुर्गाताई तांबे, बाबा ओहोळ, इंद्रजीत भाऊ थोरात, रणजीत सिंह देशमुख, संपतराव डोंगरे, बाजीराव खेमनर ,ॲड माधवराव कानवडे , सुधाकर जोशी, रामहरी कातोरे ,हौशीराम सोनवणे ,राजेंद्र कडलग ,राजेंद्र गुंजाळ, सोमेश्वर दिवटे, मिलिंद कानवडे, विश्वासराव मुर्तडक, लक्ष्मणराव कुटे, दिलीपराव पुंड,आदींसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमासाठी तालुक्यातील युवक नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक आमदार सत्यजित तांबे, कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात अमृत उद्योग समूह व जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे
