वरवंडी । झुंजार न्यूज 

 

संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथील श्री खंडोबा यात्रा निमित्ताने वरवंडी येथे स्थापलिंग ग्रुपच्या वतीने भव्य टेनिस बॉल फोरम क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आले .

गुरुवार ११ जानेवारी सकाळी दहा वाजता श्री क्षेत्र रामेश्वर मठाचे मठाधिपती दत्तगिरी महाराज यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करून स्पर्धांना सुरुवात झाली १४ जानेवारी पर्यंत या स्पर्धा चालणार आहे.स्पर्धेमध्ये सुमारे ५० संघ सहभागी होणार आहे तरी या सामन्यांसाठी विविध क्षेत्रातील वरवंडीतील क्रिकेट प्रेमींनी बक्षीस देऊन स्पर्धांची शोभा वाढविली आहे येथील बाबा कलेक्शनचे मालक सद्दाम राजमोहम्मद शेख यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर केले तर भारत संपत भोसले अमित बापूसाहेब वर्पे यांनी व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक दिले व तृतीय पारितोषिक सुदाम महादू काळे व सोमनाथ भीमराव काळे व चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक किशोर गोरक्षनाथ वर्पे यांनी दिले .

स्पर्धेसाठी बापू मारुती गागरे यांनी सौजन्य व डॉक्टर दत्ता राजेंद्र गागरे यांनी बॅट सौजन्य अक्षय भानुदास दशवंत यांनी बॉल सौजन्य दिले सोमनाथ अशोक वर्पे यांनी ट्रॉफी सौजन्य दिले.असून आबासाहेब अण्णासाहेब नेहे. या क्रिकेट क्लबचे कर्णधार असून रवींद्र राजेंद्र दशवंत उपकर्णधार असून स्थापलिंग क्रिकेट क्लबच्या सर्वच खेळाडूंनी या स्पर्धांसाठी विशेष परिश्रम घेतले.

या स्पर्धासाठी भोसले परिवारांनी मोठे मैदान उपलब्ध करून दिले व बाबा कलेक्शनचे मालक सद्दाम शेख यांनी टी-शर्ट सौजन्य दिले.या सामान्यासाठी पंचक्रोशीतील सर्वच संघांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी संयोजकांच्या वतीने करण्यात आले.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed