षटकारा चौकारांच्या आतिश बाजीने मैदान दुमदुमले

संगमनेर|झुंजार न्यूज

 

महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय असलेल्या सहकार महर्षी t20 स्पर्धेत देशातील 32 संघांनी सहभाग घेतला असून राज्य पातळीवर खेळणाऱ्या अनेक खेळाडूंचा सहभाग प्रेक्षकांची मोठी उपस्थिती आणि षटकारा चौकारांची होणारी आतिषबाजी यामुळे ही स्पर्धा अत्यंत मनोरंजन अवस्थेत आली असून रविवारपासून क्वार्टर फायनलच्या लढतीसुरू होणार असल्याची माहिती ॲड सुहास आहेर यांनी दिली आहे

काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे युवक आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जय हिंद लोक चळवळ व संगमनेर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सहकार महर्षी टी-20 स्पर्धेचे हे 24 वे वर्षे आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील सर्व मैदान हिरवळीने आच्छादित असून प्रेक्षक गॅलरीसह सर्व पॅवेलियन सजवले आहे .अत्यंत सुंदर व आकर्षक वाटणाऱ्या या मैदानात दररोज क्रीडा रसिकांची मोठी उपस्थिती असते.

या स्पर्धेत राज्य पातळीवर खेळणाऱ्या अनेक खेळाडूंचा सहभाग राहिला आहे. रविवार पासून क्वार्टर फायनल च्या लढती सुरू होत असून यामध्ये
नासिक अकॅडमी, कुबेर कन्स्ट्रक्शन, एम एस पुणे, एस आर एस मुंबई, गेम चेंजर पुणे, सेंट्रल रेल्वे मुंबई, मुंडे स्पोर्ट्स मुंबई, व जैन जळगाव.या आठ संघांनी कॉटर फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे.

या स्पर्धेतील सर्व 32 संघांना विविध पोशाख देण्यात आले असून आयपीएल सारखी ही स्पर्धा अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. या स्पर्धेला माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, डॉ जयश्रीताई थोरात, राजवर्धन थोरात , डॉ हर्षल तांबे , गिरीश मालपाणी, मनीष मालपाणी यांनी भेटी दिल्या आहेत

बुधवारी 17 जानेवारी रोजी अंतिम सामना होणार असून यावेळी मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार आणि आयपीएलचे खेळाडू उपस्थित राहणार आहेत.

तरी या सर्व क्वार्टर फायनल ,सेमी फायनल व फायनल क्रिकेट स्पर्धेचा संगमनेर मधील सर्व क्रीडा प्रेमींनी आनंद घ्यावा असे आवाहन जय हिंद लोक चळवळ व संगमनेर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले असून यामधील सर्व सहकारी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed