संगमनेर । झुंजार न्यूज
जनतेने दाखवलेला विश्वास हा सर्वात मोठा आधार असतो त्या आधाराच्या जोरावर राज्याचे महसुल मंत्री ना राधाकृष्ण विखे पा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर ता पिंप्री लौकी अजमपुर गावचा विकासत्मक चेहरा बदलुन हे गांव राज्यात आदर्श गांव म्हणुन नावारूपास आणण्यास मि कटिबद्ध राहील असा विश्वास या गावचे सा कार्यकर्ते व जनसेवा मंडळाचे अध्यक्ष भारतराव पा गिते यांनी व्यक्त केला .
नुकतिच या गावची सरपंच उपसरपंच निवड पार पडली सर्व कार्यकर्त्यांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी एकमताने सरपंचपदी सौ संगिता भारतराव गिते व उपसरपंचपदी श्री बाजीराव बबन गिते यांची बिनविरोध निवड केलचाबदल त्यांचा जाहीर सत्कार संभारंभ व कार्यकर्त्यांचे व ग्रामपंचायत सदस्यांचे आभार मानताना भारतराव गिते बोलत होते .
ते म्हणाले ना विखे पा ११ वर्षात हे गांव शिर्डी विधानसभा मतदार संघात जोडल्यापासुन या गावात विकासगंगा अवतरली आमदार निधीतुन व ग्रामपंचायतच्या माध्यमातुन ना विखे पा यांच्या मार्गदर्शनाखाली १५ कोटी रुपयांचे कामे प्रगतीपथावर आहे यापुढे गावातील राहीलेली विकासकामे करून ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने येत्या २ वर्षात हे गांव आदर्श गावाकडे वाटचाल करिल यात शंका नाही . या गावासाठी गावाअंतर्गत रस्ते . पिण्याचे स्वच्छ पाणी स्वतंत्र तलाठी कार्यालय . आरोग्य केंद्र राष्ट्रीय कृत बॅक घरकुल योजना इ समाजउपयोगी कामे मार्गाला लावण्याची ग्वाही दिली . आपआपसातील मतभेद हेवेदावे राजकारणा पुरते ठेवुन गावच्या विकासासाठी सर्वानी एकत्र येऊन पाठबळ द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली .
नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांनी सर्वाचे आभार मानले .
