शिर्डी । झुंजार न्यूज

 

कॅन बायोसिस कंपनीच्या वतीने भारताच्या अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रगतशील शेतकऱ्यांचा कृषी क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल ७५ ठिकाणी कार्यक्रम घेऊन कंपनीच्या संचालिका संदिपा कानिटकर याच्या प्रेरणेतून नुकताच पार पडला

 

या प्रसंगी मार्केटिंग हेड डॉ. प्रशांत पवार, सेल्स हेड राहुल पारखी, असि. मार्केटिंग मॅनेजर पुंजा शिदे, कृषीशास्त्रज्ञ विशाल गोसावी यांच्या उपस्थितीत राहता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे येथे प्रगतिशील शेतकरी बाबासाहेब डांगे व सौ जयश्री डांगे यांचा शाल श्रीफळ, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला .

 

या प्रसंगी बोलताना संदिपा कानिटकर म्हणाल्या की शेतकऱ्यांचे योगदान कृषी क्षेत्रात मोठे असून ज्यावेळी जगाचे अर्थकारण बंद झाले त्यावेळी फक्त शेतकरी शेतीत काम करीत होता अशा शेतकऱ्यांचे योगदान नाकारता येणार नाही असे सांगितले,

 

डॉ. प्रशांत पवार म्हणाले की, कोरोना काळात जीडीपी दर फक्त कृषी क्षेत्रामुळे टिकून राहिला याचे श्रेय शेतकऱ्यांना जाते. भारत कृषीप्रधान देश ओळखला जातो, भारत एक आर्थिक महासत्ता म्हणून पुढे येत आहे शेतकऱ्यांचे भारताच्या जडणघडणीत जे योगदान आहे त्याचा बहुमान करण्यासाठी शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला होता, त्यात राहता तालुक्यात निमगाव कोराळे येथील शेतकरी बाबासाहेब डांगे सौ जयश्री डांगे यांचा शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला

यावेळी रेवणनाथ डांगे विमल डांगे उपस्थित होते

आभार , विशाल गोसावी यांनी मानले

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *