दिल्ली । झुंजार न्यूज

 

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी भेट घेतली.

 

आगामी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला जागा सोडण्याबाबत उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. रिपब्लिकन पक्षाला शिर्डीची जागा सोडली पाहिजे अशी संबंध महाराष्ट्रातून रिपब्लिकन जनतेची मागणी असून रिपब्लिकन पक्षाला किमान दोन जागा महायुतीत सोडल्या पाहिजेत असा जनतेचा दबाव आहे.

 

शिर्डीची जागा केंद्रिय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांना सोडण्याबाबत जनतेची जोरदार मागणी असल्याची माहिती केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या पर्यंत चर्चा पोहोचल्याने त्यावर ही यावेळी चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत शिर्डीची जागा रिपब्लिकन पक्षाला सुटू शकते अशी रिपब्लिकन पक्षाची आशा या भेटीच्या बातमीमुळे पल्लवित झाली आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed