शिर्डी । झुंजार न्यूज
साईच्या प्रती श्रध्दा व त्यामुळे झालेल्या आजारातून मिळालेली मुक्ती यामुळे नागपूर येथील साईभक्त जयंत थेरे यांनी शिर्डी येथे ओम साई म्युजीकल ग्रुप यांच्या वतीने शिर्डीतील साई मंदिराजवळ असलेल्या शताब्दी मंडपात अतिशय भक्तिमय वातावरणात साई भजन संध्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला .
साईभक्त जयंत थेरे नागपूर यांच्या सह सहकाऱ्यांनी साई भजन सध्याचा कार्यक्रम सादर केला यावेळी गायक विशाल जोगदेव यांनी आपल्या सुमधुर आवाजात राम आये हे राम आये हे अशी विविध भक्तीमय साईबाबा वर आधारित विविध भजनाचे गायन केले उपस्थित साईभक्त भाविक देखील या कार्यक्रमात मोठ्या भक्तीमय वातावरणात तल्लीन झाले होते
यावेळी प्रथम साईबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यानंतर गणेश वंदना करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली साईबाबांची विविध भजने यावेळी गायकांनी सादर करत उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले तर अनेक चिमुकली मुले आणि साईभक्त भजनात तल्लीन झाल्याचे दिसून आले. यावेळी भजन संध्या कार्यक्रमात तुषार कुरकुडे,विशाल जोगदेव,प्रतीक सावरकर,भोला डोळसकर,नितेश डोळसकर,कार्तिक जैन,स्नेहल खोब्राकडे,आशिष कठाळे व प्रशांत साकोते आदी सहभागी झाले होते
