केद्रींय मंत्री ना रामदास आठवले यांच्या उपस्थितीत ५ मार्च रोजी अकोले – संगमनेर येथे महामेळावा !

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केद्रींय मंत्री ना रामदास आठवले यांच्या उपस्थितीत 5 मार्च 2024 रोजी अकोले – संगमनेर येथे होणारा ‘ कार्यकर्ता महामेळावा ‘ निमित्ताने ‘ रिपब्लिकन पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची शनिवार दि 17 फेफ्रुवारी 2024 रोजी ‘ संगमनेर शासकिय  विश्रामगृह ‘ येथे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांचे अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी दिली .

 

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे, जिल्हा संपर्क प्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव, जेष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड , दिपकराव गायकवाड, नेते राजाभाऊ कापसे जिल्हा विभागीय प्रमुख भीमराव बागुल उत्तर महाराष्ट्र संघटक रमेश शिरकांडे, युवक जिल्हाध्यक्ष पप्पु बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष सावळेराम गायकवाड, गौतम पवार, किशोर शिंदे, आदि प्रमुख नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे .

 

या बैठकीमध्ये  – 

1) केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना अकोले – संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर निमंत्रित केले आहे , त्या निमित्ताने स्वागताची तयारी करणे

2) अकोले संगमनेर तालुक्याच्या वतीने संगमनेर येथे 5 मार्च रोजी भव्य सामाजिक सलोखा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे . त्या दृष्टीने नियोजन करावे बाबद

3) कोतुळ येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमीची विकासात्मक दृष्टीने पाहणी करण्यासाठी ना आठवले यांचे दौऱ्याचे नियोजन करणे बाबद

4) उत्तर महाराष्ट्र संघटक पदी निवड झालेले रमेश शिरकांडे, जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झालेले सावळेराम गायकवाड यांचा सत्कार करणे बाबद

5) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मांग गारुडी समाजाच्या कार्यकारणीच्या निवडीत अमोल राखपसरे यांना निवडीचे पत्र देण्यात येणार असून रिपाईच्या रिक्त झालेल्या पदावर नविन पदाधिकऱ्याची निवड करणे 

6) विविध शासकीय योजनांबाबत

 

तरी होणार्‍या या बैठकीस संगमनेर , अकोले तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अकोले तालुकाध्यक्ष तथा कळस संरपच राजेंद्र गवांदे , शहराध्यक्ष कैलास कासार , कार्याध्यक्ष विजय खरात, युवा तालुकाध्यक्ष योगेश मुन्तोडे, मधुकर सोनवणे, संपत भोसले, गौतम वर्पे , सागर शिंदे, सिद्धार्थ खरात, बाळासाहेब कदम, नाना कदम, स्वप्निल कदम, जनार्दन साळवे, योहान मिसाळ, भारत भोसले, रमेश भोसले, रवी रोकडे, शरद जमधडे, आत्माराम अडांगळे, विजय अडांगळे, युवराज भालेराव, शहा नवाज बेगमपुरे, रुपेश राऊत, जॉन महांकाले, सुनील सोनवणे, रवी रुपवते*, आदीनी केले आहे .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *