हिवरगाव पावसा ग्रामस्थांचा टोलनाक्यावर एक तास रस्ता रोको

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील हिवरगांवपावसा येथे दि. १७/४/२०२४ रोजी दुपारी ४ वा. पाण्यात बुडून मृत्यू झाला होता परंतु त्या मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला नसून त्या मुलांचा घातपात झाला आहे. त्यांची सखोल चौकशी करून संबंधीतांवर गुन्हा दाखल करावा यासाठी नाशिक पुणे हायवेवर हिवरगाव टोल नाका येथे हिवरगाव पावसा ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला व प्रशासनाला निवेदन देण्यात आले

या निवेदनात म्हटले आहे की वरील विषयानुसार विनंती करतो की, आम्ही हिवरगावपावसा येथील ग्रामस्थ आपणाकडे विनंती करतो की, दि.१७/४/२०२४ रोजी सायं. ४ वा. शेततळ्यात बुडून दोन मुले रितेश सारंग पावसे व प्रणव सारंग पावसे यांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू आकस्मात झाला नसून हा पूर्णपणे घातपाताचा प्रकार आहे. आम्ही अनेकवेळा तालुका पोलीस स्टेशन व डी. वाय.एस.पी. ऑफीस संबंधीत अधिकारी यांना भेटलो. मात्र प्रत्येक वेळी आश्वासन मिळाले मात्र अद्याप पर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे हिवरगांव ग्रामस्थांची बैठक घेऊन सर्व ग्रामस्थाने एकमुखाने हा घातपाताचा प्रकार असा संशय व्यक्त केला . त्यामुळे प्रशासन आरोपींना पाठीशी घालत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी दि.२८/५/२०२४ पर्यंत संबंधीतांवर खूनाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी केली त्यात पोलीस प्रशासनाला अपयश आल्यामुळे दि.२९/५/२०२४ रोजी हिवरगांवपावसा सर्व ग्रामस्थ हिवरगांवपावसा, पुणे नासिक हायवेवर टोल नाक्यावर रास्ता रोको करण्यात आला असून तरी संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी संपूर्ण गावकऱ्यांनी मागणी आहे. यावेळी टोल नाक्यावर दोन्ही साईडने वाहनांच्या दोन किलोमीटरपर्यंत रांगाच रांगा लागल्या होत्या

 

 

 

यावेळी रिपाई राज्य नेते श्रीकांत भालेराव , माजी भाजपा तालुकाध्यक्ष काशीनाथ पावसे डॉ.प्रमोद पावसे. सरपंच सुभाष गडाख उपसरपच सुजाता दवंगे,किरण पावसे, गणेश दवंगे यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed