कर्जत । झुंजार न्यूज
देवा खरात
कर्जत तालुक्यातील चिलवडी येथे घराच्या जागेवरुन पती , पत्नी व मुलांना मारहाण तर अल्पवयीन मुलीचा विनंयभंग केल्याने कर्जत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल .

उपीन रमेश भोसले यांन दिलेल्या फिर्यादीवरुन दि.26/6/2024 रोजी सकाळी 11:30 मि उपिनचा भाऊ सचिन रमेश भोसले त्याचा मुलगा निखिल सचिन भोसले हे दोघे माझ्या आले आणि माझे घरासमोर विटा टाकुन पाया खांदु लागले मी त्यांना म्हणालो कि मी एवढे कष्ट करून जागा विकत घेतली आहे आणि तुम्ही माझे जागेमध्ये तुमचे घर कसे बांधु शकता ही जागा माझी वैयक्तिक मालकीची आहे या जागेमध्ये तुम्ही घर बांधू शकत नाही व बांधु देणार नाही असे म्हटले असता त्यांनी मला व माझे पत्नीला व अल्पवयीन मुलीला गलीच्छ भाषेत शिविगाळ केली त्यानंतर माझी मुलगी या घटनेचा मोबाईल मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत होती हे निखिल सचिन भोसले यांनी बघितले आणि तू माझे मुलीच्या पाठीमागे दगड घेऊन पळू लागला मुलगी घरात जाऊन लपली मुलीने दरवाजा लावून घेतला निखिलनी दरवाजा लाथा मारून उघडला मुलीला घरात पाहू लागला त्याने मुलीवरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला मी सोडवायला गेल्यानंतर माझ्यावर कुऱ्हाडीने वार करून कानावरती माने वरती पाठीला जबर मारहाण केली व मला जखमी केले माझे मुलीला व पत्नीला केसाला धरून मारहाण केली आम्हाला मारत होता म्हणून आम्ही लपलं त्यावेळी निखिल भोसले यांनी घरामधील घुसून घरातील मौल्यवान वस्तू कुलर पंखा फ्रिज टीव्ही व इतर वस्तूही कुऱ्हाडीने तोडफोड केली माझ्या घरातील वस्तूंचा पूर्ण नाश केलेला आहे माझ्या घरासमोरील आंब्याचे झाडे कुराडीने तोडलेली आहेत

आंब्याची झाडे जशी तोडत आहे तशे तुम्हाला मी तोडून अशाप्रकारे कर्जत तालुक्यातील चिलवडी येथील ही घटना घडलेली आहे.
