संगमनेर | झुंजार न्यूज
कोरोना काळात ऑक्सिजनचा तुटवडा आणि त्यामुळे जवळचे गेलेले नातलग हा अत्यंत वाईट अनुभव सर्वांच्या पाठीशी आहे. ऑक्सीजन चे महत्व केव्हा सर्वांना कळाले . हा ऑक्सिजन देणारी वृक्ष असून निरोगी जीवनासाठी पर्यावरण संवर्धन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन प्रकल्प प्रमुख सौ दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.

कोळवाडे जयहिंद आदिवासी आश्रम शाळा यांच्या वतीने दंडकारण्य अभियानांतर्गत मोरया डोंगर येथे 2000 वृक्षांचे तर मल्हार घाट ते पिंपरणे रोड दुतर्फा 5000 वृक्षांचे रोपण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी समवेत आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, मुख्याध्यापक दशरथ वर्पे, काशिनाथ गोंदे, फादर रॉबर्ट डिकोस्टा, भाऊसाहेब नवले, उपसरपंच बाळू गोंदे, मंगेश वरपे, सौदामिनी कानोरे ,पर्यवेक्षिका श्रीमती कोल्हे, मधुकर गोंदे, दत्तू तारडे, शिवाजी कुदळ, योगेश गुंजाळ, विलास गुंजाळ ,साहेबराव मरभळ, आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, आमदार बाळासाहेब थोरात व मा आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या अभियानात तालुक्यातील सर्वांनी सहभाग घेतल्याने दंडकरण्य ही मोठी लोकचळवळ झाली आहे.

तालुक्यात वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली असून आता तालुका हिरवा दिसू लागला आहे कोरोना संकटामध्ये सर्वांना ऑक्सिजनचे महत्त्व कळाले ऑक्सिजनची निर्मिती ही वृक्ष करत असून त्यांना घरातील सदस्याप्रमाणे प्रत्येकाने जपले पाहिजे. झाडी डोंगर ही आपली नैसर्गिक संपत्ती प्रत्येकाने अभिमानाने जपावी असे आवाहनही त्यांनी केले.

तर प्रा.बाबा खरात म्हणाले की, या अभियानामध्ये विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग आहे. मुले ही खरी वृक्ष दूध असून प्रत्येक विद्यार्थ्याने किमान दोन वृक्षाचे रोपण करून त्याचे संवर्धन करावे. याचबरोबर आपल्या परिवारात आणि नातेवाईकांमध्येही वृक्ष संवर्धनाबाबत जागृती करावी असे आव्हान त्यांनी केले. यावेळी प्रा बाबा खरात यांनी गीते गायली याप्रसंगी शाहीर शिवाजी कांबळे, सत्यानंद कसाब ,शिवराम बिडवे, बाळासाहेब फापाळे, बबन सावंत आदींसह विविध कलाकार उपस्थित होते
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दशरथ वर्पे यांनी केले तर मंगेश वरपे यांनी आभार मानले पर्यावरण गीतांनी आज हार्मन हिल व मोरया डोंगर दुमदुमून गेला होता

