आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील पुर्वेकडील असणाऱ्या बांभूळदरा व परिसरात पट्टेरी वाघाने धुमाकूळ घातला असून या वाघाने आतापर्यंत अनेक जनावरांची शिकार करुन बळी घेतल्याचे सांगितले जात आहे. तर रविवारी एका शेतकऱ्यांवर चाल केल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने वनविभागाने याची त्वरीत दखल घेवून या वाघासह दोन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गेल्या काहीपासून या पट्टेरी वाघाने बांभूळदरा व परिसरात ठाण मांडले आहे. मात्र आता हा वाघ हळूहळू मानवी वस्तीकडे वळू लागल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यत बिबट्यानी रात्रीच्या वेळी मानवी वस्त्यांमध्ये घुसून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करत होते. आता मात्र बांभूळदरा परिसरात पट्टेरी वाघाने आपले बस्तान ठोकले आहे. येथे वाघाल लपण्यासाठी डोंगराच्या कपारी असल्याने वाघ या कपाऱ्यात दबा धरुन राहतो जनावरे दिसले की , त्यांची शिकार करतो दिवसाढवळ्या वाघ हा या परिसरात फिरताना अनेकांनी बघितले आहे .

रविवारी दुपारी ३ वाजल्याच्या सुमारास भिमाजी महादू गफले यांच्या कालवडीवर हल्ला करुन जख्मी केले तर बोकड्या घेवून पसार झाला या पुर्वी हरि गफले , भावका कदम , काशिनाथ चव्हाण यांच्या शेळ्या , बोकडयांवर हल्ला चढवत दोन शेळ्या जख्मी तर तीन ते चार बोकडे फस्त केले या सर्व घटना ४ ते ५ दिवसामधील असून रविवारी गुरे वळणाऱ्या शेतकऱ्यावर चाल केल्याने दहशती वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने या वाघाचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी गावकर्यांनी केली आहे .

Post Views: 887

