आश्वी l झुंजार न्यूज
गोमांसाच्या कत्तलीकरिता तीन वासरांची वाहतुक करणाऱ्या वाहनास पोलिसांनी पानोडी – हजारवाडी मार्गावरील असणाऱ्या निळवंडे उजव्या कालव्यावर पकडले. याप्रकरणी आश्वी पोलिस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.

घटनेबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बुधवार रात्री दहाच्या सुमारास पानोडी – हजारवाडी मार्गावरील निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यावर एम एच १७ बी वाय ४९१३ क्रमांकाचे सफेद मारुती कंपनीची सुपर कॅरी माल वाहतुक वाहनात सफेद , काळे टिपके असणारे जर्सी जातीचे तीन नर वासरे संतोष चव्हाण , जनार्धन चव्हाण , संकेत तांबे यांना शंका आल्याने त्यांनी वाहनास थांबविले असता वाहनातील चालक मुबारक रशीद शेख हा मागून येणाऱ्या साथीदार फिरोज नबाब शेख यांच्या मोटार सायकलवर पळून गेला वाहनाची तपासणी करत

याप्रकरणी पो.हे.कॉ. विजय मच्छिद्र गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आश्वी पोलिस ठाण्यात वरील दोन जणांविरूद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ चे कलम ५,९ व भादंवि कलम १८८, २७९, २७१, ३४ साथ रोग अधिनियम १८९७ चे कलम ३,११ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पो.हे.कॉ ए डी शिंदे करीत आहेत
