डाॅ.विखे पाटील कृषी परिषदेची मागणी
संगमनेर l झुंजार न्यूज
पुराच्या पाण्याने नूकसान झालेल्या शेतीमालाचे पंचनामे करून,शेतकर्याना तातडीने भरपाई द्यावी आशी मागणी पद्मश्री डाॅ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने करण्यात आली.
तालुक्यात मागील तीन चार दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने रहीमपूर ओझर कनकापूर जोर्वे आदी गावात नदीपात्रालगत असलेल्या शेत जमीनीत मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी गेल्याने शेतातील फ्लाॅवर टोमॅटो ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले.
पदश्री डाॅ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांच्या शिष्टमंडळाने तहसिलदारांची भेट घेवून झालेल्या नूकसानीचे तसेच भरपाईच्या मागणीचे निवेदन सादर केले.
कृषी परिषदेच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनात पुराच्या पाण्यामुळे हाताशी आलेले पीक गेल्याने शेतकर्यांना मोठ्या अर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले आहे.त्यातच नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांना शासनाकडून नूकसान भरपाई मिळाल्यास मोठा दिलासा मिळेल यासाठी पंचनामे तातडीने करून नूकसानीचे प्रस्ताव पाठविण्याची विनंती परिषदेच्या वतीने तहसिलदार अमोल निकम यांना करण्यात आली.
तहिलदार अमोल निकम यांनी तातडीने या भागातील तलाठी आणि मससूल प्रशासनास पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.याप्रसंगी शांताराम शिंदे बाजीराव शिंदे. रविंद्र गाढे गणपत शिंदे संतोष गुळवे,श्रीपत राक्षे,सतिष वाळूज विकास गुळवे,बाबासाहेब शिंदे गोरक्षनाथ शिंदे,भाऊसाहेब गुळवे नामदेव शिंदे शिवाजी शिंदे मच्छीद्र गुळवे अरूण शिंदे भिमाजी वाळूज भाऊसाहेब वाळूंज गोरीक्षनाथ वाळूंज आदी शेतकरी याप्रसंगी उपस्थित होते.
