संगमनेर | झुंजार न्यूज
संगमनेर शहरातील व्यापारी असोशियन हॉल येथे उत्तर अहिल्यानगरची मिशन २०२४ विधानसभा आढावा बैठकीतून राष्ट्रीय समाज पक्ष संगमनेर विधानसभा लढवणार हे ठरले !

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ (नाना) शेवते हे बैठकीचे अध्यक्षस्थानी होते . तर ज्ञानेश्वर माऊली सलगर मुख्य राज्य महासचिव , डॉ. प्रल्हाद पाटिल राज्य सचिव , सय्यद बाबा शेख कार्यकारणी सदस्य , शरदराव बाचकर अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र , अजित पाटील पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष , सौ अनिताताई बागुल उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष महिला आघाडी , रभाजी खेमनर उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष , शशिकांत मतकर उत्तर महाराष्ट् उपाध्यक्ष , डॉ.सुनिल चिंधे सचिव उत्तर महाराष्ट्र , दतात्रय कचरे सदस्य उत्तर महाराष्ट्र , आशुतोष जाधव युवक आघाडी अध्यक्ष उत्तर महाराष्ट् , नानासाहेब जुंधारे जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर , नानासाहेब काटकर शिर्डी लोकसभा अध्यक्ष , श्रीमती सुवर्णांताई जऱ्हाड महिला जिल्हाध्यक्षा , नंदुभाऊ खेमनर युवक आघाडी अध्यक्ष , महिला तालुकाध्यक्षा तयेबा जावेद सय्यद, महिला शहरध्यक्षा सौ. भोई , विधानसभाध्यक्ष भाऊसाहेब वारे, तालुका उपाध्यक्ष मच्छिंद्र खेमनर , शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष बाळासाहेब घोडे , रासपचे जेष्ठ नेते बाबुराव पवार , युवक अध्यक्ष पंकज खेमनर , संपर्क प्रमुख एकनाथ बिडगर , राजु घोडे , बाजीराव दातीर आदीसह प्रमुख पदाधिकारी व संगमनेर अकोले राहुरी राहता कोपरगाव श्रीरामपुर नेवासा तालुक्यातील तालुकाध्यक्ष , उपाध्यक्ष , विधानसभाध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते .

नुकताचं राष्ट्रीय समाज पक्षाचा २१ वा वर्धापणदिन अकोले जिल्हा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नाना शेवते यांनी महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदार संघ राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार याची घोषणा केली .

यावेळी महादेव जानकर यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिल्यान सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये आढावा बैठकी चालू आहे याचाच अनुषंगाने संगमनेरमध्ये आढावा बैठक संपन्न झाली .

या बैठकीमध्ये बुथ कार्यकर्तेचा मेळावा होणार आहे अशी माहिती देत जिल्हाध्यक्षाना व तालुकाध्यक्षाना राष्ट्रीय समाज पक्ष विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार आहे असे आदेश देऊन इच्छुक उमेदवारांची चाचपणी घेण्याचं आदेश दिले संगमनेर येथिल विधानसभा मतदारसंघ २१७ राष्ट्रीय समाज पक्ष लढणार आहे अशी माहिती तालुकाध्यक्ष सोपान तांबडे यांनी वरिष्ठांना माहिती दिली .

सुत्रसंचालन नानासाहेब जुंधारे यांनी केले व आभार रभाजी खेमनर यांनी केले .

