{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

शिबलापूर येथे खा . निलेश लंके यांच्या भव्य सत्कार व वह्या तुला सोहळा

आश्वी l झुंजार न्यूज

मह्राष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन गावागावातुन माझ्यावर प्रेम करणाऱ्या सामान्य लोकांनी मला निवडुन आणण्यासाठी प्रयत्न केले. दक्षिण नगर मतदार संघाचा निकाल हा महाराष्ट्राला नव्हे तर देशाचं राजकारण बदलणारा होता. तसेच तो देशाच्या राजकरणाची दिशा बदलणारा ठरला. माझ्या विजयामुळे सामान्य कार्यकत्यांना आपण राजकारणामध्ये निवडुन येऊ शकतो यांची खात्री झाली व त्यांचा उत्साह वाढला असुन सामान्य व्यक्तीला ही राजकारण महत्व असल्याचे यामुळे आधोरेखीत झाले असल्याचे नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी मत व्यक्त केला.
सरकार बदलते है दिन बदलते है, आज देशात व महाराष्ट्रत भाजप प्रेणीत सरकार आहे त्यामुळे त्याच्या मंत्र्या मागे पुढे मोठा सरकारी ताफा असतो फेब्रुवारी मध्ये आपले सरकार य़ेईल. मग आपल्याही मागे पुढे असाच सरकारी ताफा असेल. सत्तेच्या कालखंडामध्ये सामान्य जनतेचे कामे करा.सत्तेचा वापर हा विकास कामासाठी झाला पाहिजेल तसेच सत्तेचा फायदा समाजासाठी झाला पाहिजे कोणाच्या जिरवा जिरवी साठी सत्तेचा उपयोग करू नका असे उदगार खासदार निलेश लंके यांनी काढले.
         
शिर्डी मतदार संघातील संगमनेर तालुक्यातील शिबलापुर येथे संजय मन्तोडे व मित्र मंडळाने आयोजित पुस्तक तुला व नागरी सत्कार निमित्याने खा निलेश लंके बोलत होते. कलयुगातील कृष्ण (खारदार निलेश लंके) व सुदामच्या (संजय मन्तोडे) भेटीमुळे शिर्डी मतदार संघ वेगळ्याच चर्चेला उधान आले आहे. 
पुढे बोलतांना ते म्हणाले की सरकार काय कुणाचे अमरपट्टी घेऊन आले नाही. राजकारणात असे कोणी ही वाचुन कोणाचे आडत नाही.दिन बदलते है. योग्य वेळेची वाट बघत राहायचे असते. सत्तेचा वापर ही विकासाच्या कामासाठी करा. सरकार बदलते है दिन बदलते है, आज देशात व महाराष्ट्रत भाजप प्रेणीत सरकार आहे त्यामुळे त्याच्या मंत्र्या मागे पुढे मोठा सरकारी ताफा असतो फेब्रुवारी मध्ये आपले सरकार य़ेईल. मग आपल्याही मागे पुढे असाच सरकारी ताफा असेल. सत्तेच्या कालखंडामध्ये सामान्य जनतेचे कामे करा.सत्तेचा वापर हा विकास कामासाठी झाला पाहिजेल तसेच सत्तेचा फायदा समाजासाठी झाला पाहिजे कोणाच्या जिरवा जिरवी साठी सत्तेचा उपयोग करू नका 
   
पुढे बोलतांना नेते म्हणाले की, खासदार म्हणुन निवडुन आल्यां नंतर संसद भवनात गेल्या नंतर मलात स्वःतावर विश्वास बसला नाही देशाचे पतंप्रधान नरेद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, खा अखिलेश यादव, या नेत्यांना आपण केवळ टिव्ही वरच बघत होतो दक्षिण नगरच्या मायबाप जनतेमुळे यांना प्रत्येक्ष भेटण्याचा योग मिळाले . राजकारणात तुम्ही कीती ही मोठे आहात याचा उपयोग नसतो प्रेमाने दोन हात जोडल्याने लोखो मतदार तुमच्या मगे उभे राहाता हे दक्षिण नगरच्या निवडणुकीत लोकांनी दाखवुन दिले असल्याचे खा निलेश लंके यांनी सागितले. संजय तु राजकारणात येवु नकोस राजकारणी लोकांना खुप शिव्या खाव्या लागतात तु कोव्हीडच्या काळात जशी लोकांची सेवा केली तशीच पुढे ही सेवा करत राह. तुझा मोठा भाऊ म्हणुन मी नेहमीच तुझ्या सोबत आहे, असे खा निलेश लंके यांनी सांगितले.
  
यावेळी आयोजक संजय मुन्तोडे, सरपंच प्रमोद बोन्द्रे, जि.प माजी अध्यक्ष अरुण कडु, माजी सरपंच भास्कर खेमनर, संगमनेर दूध संघाचे संचालक तथा उपसरपंच विक्रम थोरात , पानोडी सोसायटी चेरअरमन बबनराव कराड , सौ शितल उगलमुगले , अक्षय दिघे ,  हंगेवाडी सोसायटी चेअरमन दिपक कांगणे, तात्यासाहेब गायकवाड , प्रकाश गायकवाड, संतोष नागरे, भारत शेवाळे , रिपाई युवक तालुकाध्यक्ष योगेश मुन्तोंडे , बाळासाहेब नागरे , सदिप कराड , शाकिर शेख, अन्वर शेख, राहुल मुन्तोडे, मोईन शेख, इन्नुस सय्यद, सागर कडू, गबाजी खेमनर, राजेद्र नागरे, भिमराज सांगळे, सुभाष मुन्तोडे, रमेश मुन्तोडे, दिलावर शेख, संजय म्हस्के,भाऊसाहेब डोलनर, सचिन खेमनर, हरी वालझाडे, अँड लक्ष्मण खेमनर, दत्ताशेठ दुर्गेडे, भैय्या शेख, रियास शेख, वसंत मुन्तोडे, विक्रम नागरे, विशाल मुन्तोडे, राजेंद्र बोंद्रे फिरोज शेख, परवेज शेख, रोहिदास म्हस्के, दिनकर बोंद्रे आदी उपस्थित होते.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed