पानोडी l झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील पानोडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि.१३/०९/२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता संस्थेच्या शिवतिर्थ सभागृहामध्ये होणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन बबनराव कराड यांनी दिली .
१९२६ साली स्थापन झालेल्या २०२६ ला १०० वर्ष पुर्ण करत असून या ९८ वर्षामध्ये कै शिवाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली मोठी घौडदौड केली . सभासदाचा विश्वास व पारदर्शक कारभारामुळे संस्था आजपर्यंत प्रगतीपथावर असून सभासदाच्या विश्वासहर्तावर चालणाऱ्या या संस्थेचा शुक्रवारी दि १३ सप्टेबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता सर्वसाधारण वार्षिक सभा होणार असून या सभेत
१) मा. अध्यक्षसाहेब यांची निवड करणे बाबत.
२) दिवंगत सभासद थोर नेत्यांना व जवानांना श्रध्दाजली अर्पन करणे बाबत.
३) मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे बाबत.
४) सन २०२३-२०२४ सालातील वार्षिक अहवाल, तेरीज पत्रक, ताळेबंद पत्रक नफा तोटा पत्रक व व्यापारी पत्रक वाचुन मंजूर करणे 
५) संस्थेचे ३१/३/२०२४ च्या लेखापरिक्षण अहवाल वाचून नोंद घेणे व सन २०२२-२०२३ सालाचे दोषदुरूस्ती वाचून नोंद घेणे बाबत.
६) सन २०२४-२०२५ सालाकरिता कमाल मर्यादा पत्रके तयार करून बँकेकडे मंजुरीस पाठविण्याचा अधिकार संचालक मंडळास देणे बाबत.
७) सन २०२४-२५ च्या खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता देऊन संचालक मंडळास अधिकार देणे बाबत.
८) बँकेकडून कॅश क्रेडीट हायपोथिकेशन माल वितरण कर्ज उचलण्याचा अधिकार संचालक मंडळास देणे बाबत.
९) थकबाकीदार सभासदांच्या कर्ज वसुलीबाबत विचार करणे.
१०) संचालक मंडळाला दिलेल्या कर्जाचे विवरण पत्र नमुद करणे बाबत.
११) सन २०२४-२०२५ या वर्षाचे वैधानिक लेखापरिक्षण करणे कामी लेखापरिक्षकाची नेमणूक करणे बाबत.
१२) महाराष्ट्र संस्था अधिनियम १९६० चे कलम २४ नुसार सभासद कर्मचारी यांना सहकार शिक्षण व प्रशिक्षण देणे बाबत.
१३) वार्षिक सभेसाठी गैरहजर असलेल्या सभासदांना सभेसाठी क्षमामापन करणे
१४) मा. अध्यक्षसाहेब यांचे परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे. आदी विषय घेतले जाणार आहे .
तरी होणाऱ्या वार्षिक सभेस सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन बबनराव पांडुरंग कराड , व्हा चेअरमन कारभारी गंगाधर जाधव , विनायकराव शिवाजीराव थोरात , विठोबा शंकर जाधव , भाऊसाहेब तुकाराम तळेकर , कारभारी भागा साबळे , मधुकर सखाराम ढोणे , भाऊसाहेब यादव मुन्तोडे , रावसाहेब सबाजी हजारे , पुष्पा महादु पाबळ , नवसाबाई शांताराम खैर , आप्पासाहेब नामदेव खेडकर , नामदेव किसन सानप , नामदेव कारभारी गपले , मुक्ता मनाजी हजारे , सचिव प्रविण मधुकर आढाव , सहाय्यक आण्णासाहेब बाबुराव पाबळ , सेल्समन संदिप सुर्यभान थोरात ,  क्लार्क विवेक शामराव जाधव यांनी केले आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed