ना. रामदास आठवलेच्या राज्यात 60 सभा
मंत्रीमंडळाच्या पहिल्या शपथविधी सोहळ्यात प्रतिनिधित्व देण्याची मागणी

आश्वी l झुंजार न्यूज
2024 चा राजकिय शोले घडला त्यात महायुतीने बाजी मारत 236 विधानसभेच्या जागा पटकवत घटक पक्षाच्या कामगिरीतून एक ऐतिहासिक क्षण निर्माण झाला रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी तर पायाला भिंगरी बांधत राज्यात तब्बल 60 सभा घेवून वातावरण निर्मितीत सिंहाचा वाटा रोवल्याने राज्यातील सत्तेच्या वाटेत रिपब्लिकन नेत्यांना पहिल्या फेरीत पसंती मिळावी ही अपेक्षा लागल्याचे चित्र दिसत आहे .

2009 साली शिवशक्ती , भिमशक्तीचा निर्णय घेत रामदास आठवलेच्या रिपब्लिकन पक्षामुळे राज्यात नव्हे तर देशातचं राजकिय सत्तेचे वातावरण निर्माण झाले खरे पण त्या प्रमाणात राज्यातील पदाधिकारी , कार्यकर्ते यांना सत्तेच्या प्रवाहात आणले गेले नाही तरी ही रामदास आठवले यांच्यावर एकनिष्ठा ठेवू कार्यकर्ते आज ना उदया आपलेल्या सत्तेची संधी मिळेल यांची वाट पाहू लागले .2014 ला देशात नरेंद्र मोदीची सत्ता आल्यानंतर दोनअडीज वर्षानंतर रामदास आठवलेच्या रुपाने दलित नेत्याला मंत्री मंडळात संधी मिळाली तीच परिस्थिती राज्यात झाली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले . अगदी शेवटी – शेवटी अविनाश महातेकरांना राज्यमंत्री तर राजा सरवंदे यांना महामंडळ देण्यात आली मात्र त्यानंतर काहीचं नाही .2021 ला भाजपाच्या युतीतून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा मंत्रीपद , महामंडळे मिळतील ही अपेक्षा ठेवली मात्र अडीज वर्ष कशी गेली कळलेचं नाही . मात्र रामदास आठवले यांना याकाळ आपल्या पक्ष वाढीकरीता बळकटी दिली त्यांचे कार्यकर्ते हे नि:स्वार्थी पणे काम करत राहीले . कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देशात पक्षाची ताकद वाढविली . मात्र 2024 ला शिर्डी लोकसभेतून जाण्याकरिता अनेकदा इच्छा व्यक्त करुन ही राज्यातील महायुतीच्या नेत्यांच्या गोंधळामुळे त्यांची इच्छाचं ढूसूर झाल्यामुळे लोकसभा निवडणुकी काळात दलित समाज्यात नाराजी पसरली त्यात महाविकास आघाडीने संविधानाचा मुद्दा उचलत वातावरण निर्मिती केली त्यामुळे बऱ्यापैकी महाविकास आघाडीला यश आल्याने भाजपाचे हुकमी एक्का बनण्याचे स्वप्नचं भंग झाल्याने राजकिय धूर्त फडणवीसांनी ओळखले असे पुन्हा विधानसभा निवडणुकीत घडू नये म्हणून रणनिती आखली मात्र ती रिपब्लिकन नेत्यांना समजलीचं नाही इकडे सभेतून , पत्रकाद्वारे , बैठकामधून विधानसभेला जागेची मागणी करु लागले . यातचं वेळ गेला फडणवीस – शिंदे – पवार या त्रिदेव व्यक्तीरीक्त कुठल्याही घटक पक्षाचा विचार झाला नाही . त्यामुळे महायुती घटक बाजूला झाले . तर रिपब्लिकन पक्षाला आश्वसीत करत सत्ता आल्यानंतर पहिला विचार करु असे सांगितले गेल्याने रिपब्लिकन नेत्यासह कार्यकर्ते निवडणुकीच्या कामाला लागले .

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी 40 दिवसाच्या कालावधीत वेगवेगळ्या मतदार संघात जावून 60 सभा घेतल्या दलित समाज्यासह विविध समाज्याला केंद्र व राज्य सरकारचे धोरण , विकास पटवून दिला . अहिल्यानगर जिल्हयात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकरिता लोणीत सांगता सभा तर प्रा राम शिंदे यांच्याकरिता कर्जतला सभा घेतली .

रिपब्लिकन पक्षाचा कुठलाही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नसतानाही रामदास आठवले यांनी महायुतीच्या उमेदवाराकरिता तब्बल 60 सभा घेतल्या ही मोठी जमेची बाजू असून राज्यात एक ऐतिहासिक विजय मिळवून महायुतीने तब्बल 236 जागा घेतल्या यात नक्कीचं रिपब्लिकन पक्षाचा सिंहाचा वाटा म्हणावे लागेल त्या नुसार नव्यानं होणाऱ्या राज्य मंत्रीमंडळाच्या शपथविधी सोहळामध्ये रिपब्लिकनला पतिनिधीत्व मिळावे अशी मागणी होताना दिसत असून रिपब्लिकन प्रतिनिधी हा नक्कीचं मंत्री म्हणून शपथ घेताना दिसेल असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे .
राजेश गायकवाड ( पत्रकार , 7020493305 )
Post Views: 767

