अकोले । झुंजार न्यूज
12 डिसेबर म्हणजे एक असाधारण महत्वाचा दिवस आहे . महाराष्ट्र घडविणाऱ्या अनेक मान्यवरांचा जन्मदिवस असून स्व.यशवंतराव आंबेडकर , स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासह जाणता राजे शरदचंद्रजी पवार असतील….
यातच एक नाव समाविष्ट होते ते म्हणजे अकोले तालुक्याचे भूमिपुत्र व सुगावचे सुपुत्र विजयराव वाकचौरे हे अहिल्यानगर जिल्ह्यालाचं नव्हे तर संपूर्ण राज्यात ” विजुभाऊ ” या नावाने परिचित हे व्यक्तिमत्त्व म्हणजे दलित, आंबेडकरी, रिपब्लिकन चळवळीला लाभलेलं एक रत्नच होय .
अकोले तालुक्यातील सुगावा या छोट्याशा खेडेगावात एक शेतकरी कुटुंबात भाऊंचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षनानंतर उच्च शिक्षणासाठी भाऊ साधारणपणे 1970-72 साली मुंबईला गेले.संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असतांना, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन भाकरीपेक्षा शिक्षणाला महत्त्व देत,भाऊंनी सिद्धार्थ कॉलेज, वडाळा गाठले. तिथे विद्यार्थीदशेत असतांना त्यांची भेट अकोल्याचेच अजून एक सुपुत्र स्व.भाई संगारे यांच्याशी झाली.
विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन त्यांनी अनेक आंदोलने करून तत्कालीन सरकारचे लक्ष मागासवर्गीय, अदिवासी वसतिगृह, विद्यार्थी यांच्याकडे वेधले.आंबेडकरी चळवळीत काम करत असताना त्यांना स्व.राजा ढाले,स्व.नामदेव ढसाळ, आत्ताअसलेले केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री मा.ना.रामदासजी आठवले साहेब यांची साथ मिळाली, दलित पँथर चळवळीतही भाऊंनी हिरीरीने भाग घेतला.
अनेक सामाजिक प्रश्नांवर मुबंई सह महाराष्ट्रत आवाज उठवला, चळवळ ऐन बहारात असतानाच कौटुंबिक कारणास्तव भाऊंनी मुंबई सोडली. ते पुन्हा आपल्या मुळगावी सुगाव येथे परतले, आंबेडकरी विचार स्वस्थ बसू देत नव्हते, भाऊंनी 1993 ला ग्रामपंचायत निवडणूकित भाग घेतला. ते सर्वसाधारण जागेवर निवडून गावचे सरपंच झाले. नगर जिल्ह्याची ओळख साखर कारखानदारांचा जिल्हा, दलित अत्याचारात अग्रेसर असणारा जिल्हा, अशी होती. तरी देखील सर्वसाधारण निवडून येऊन भाऊंनी गावातील ग्रामस्थांची सेवा केली.
रिपब्लिकन पक्षाचा महाराष्ट्रत झंझावात सुरू होता, मा.ना.रामदासजी आठवले यांनी पक्षाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी भाऊंची निवड केली, भाऊंनी ती यथायोग्य 25 वर्ष पार पाडली.
नगर जिल्ह्याच्या खेड्यापाड्या पर्यंत पक्ष पोहचवला,जिथे अन्याय होईल तिथे प्रत्यक्ष उभे राहून जनतेला न्याय मिळवून दिला. यातून अनेक कुटुंबांचा आणि भाऊंचा स्नेहाचा मैत्रीचा संबंध तयार झाला.
2008 साली जेव्हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ एस सी साठी राखीव झाला, तेव्हा काँग्रेस पक्षाने मा.रामदासजी आठवले साहेब यांना संधी दिली, परंतु जातीयवादी प्रचार, कारखानदारांच्या वर्चस्वाला धक्का पोहचेल म्हणून कुटनीतीने आठवले साहेबांचा सर्वसंमतीने पराभव करण्यात आला. हा धोका आठवले साहेबांचे सहकारी मित्र विजुभाऊ यांना सहन झाला नाही, त्यांनी पराभवाची जबाबदारी घेत,पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. व राजकीय संन्यास घेतला, परंतु भाऊंच्या प्रती आठवले यांच्या असलेल्या मित्रप्रेमा मूळे साहेबांनी त्यांना पुन्हा महाराष्ट्र राज्य सचिव या पक्षाच्या पदाची जबाबदारी सोपवली.
वैचारिक मतभेद असतांना देखील निवडणुकीतील पराभवामुळे आठवले यांनी शिवशक्ती भीमशक्ती चा राजकीय प्रयोग स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत केला.
पुढे राजकिय महायुती भाजपा सोबत आठवले यांनी केली,
आठवले यांचा आदेश प्रमाण मानुन प्रत्येक निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना अहिल्यानगर जिल्ह्यात निवडून आणण्यासाठी विजुभाऊंनी काम केले, राज्यात भाजपा, शिवसेना,रिपाई महायुतीचे सरकार आले. ठरल्याप्रमाणे रिपाइला काही महामंडळ व राज्यमंत्री पद देण्यात येणार होती मात्र काही नाट्यमय राजकिय घडामोडी मुळे अडीज वर्षात ते मिळाले नाही .परंतु डगमगता महायुतीची घोडदौड सुरूच राहिली, संपूर्ण नगर जिल्ह्यात महायुतीचा विचार विजुभाऊंनी पायाला भिंगरी लावून पोहोचवला.
विधानसभा2024 ला महायुती सरकारला मोठे यश प्राप्त झाले, त्यात नगर जिल्ह्याचा सिहाचा वाटा राहिला आहे, सर्व रिपब्लिकन कार्यकर्ते झोकून देऊन महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करत होते, आता पुन्हा तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचा मान रामदासजी आठवले यांचे निकटवर्तीय मा.ना.देवेन्द्रजी फडणवीस साहेब यांना मिळाला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे, त्यात रिपाइं ने राज्यमंत्री पदाची मागणी केली आहे, व ती यथायोग्य आहे. आज विजयराव वाकचौरे यांचा वाढदिवस आहे, संपूर्ण तारुण्य चळवळी साठी व्यतीत केलेला हा पँथर आता वार्धक्यात प्रवेश करत आहे, रिपाइंला मिळणारे राज्यमंत्री पद विजुभाऊ यांना देऊन अहिल्यानगर मधील सर्व आंबेडकरी जनतेचा सन्मान ना.मा.रामदासजी आठवले यांनी करावा अशी अपेक्षा सर्व भीमसैनिकांना वाटते,हीच खरी सदिच्छा, शुभेच्छा, मा.विजयराव वाकचौरे यांच्या कार्याची असेल..
