शासकीय वाळु डेपो तसेच वाळु उपसा तात्काळ बंद करण्यात यावा यासाठी विशेष ग्रामसभेतून ठराव झाला : गितांजली मुन्तोडे
आश्वी । झुंजार न्यूज
शिबलापुर माळेवाडी येथे काल दि ५ मार्च रोजी शासकीय वाळु डोपो तसेच वाळु उपसा तत्काळ बंद करण्यात यावा यासाठी विषेश ग्रामसभेमध्ये ठराव करण्यात आला. तसेच या बाबदचे पत्र संगमनेर महसूल विभागाला देण्यात आली होती. तरी ही ठेकेदारानी नदी पत्रातुन वाळु उपसा तसेच नदी पात्र ते वाळु डेपो वाळु वाहतुक सुरू ठेवल्याने ग्रामस्थांनी ठेकेदाराच्या ५ वाळु वाहतुक करणाऱ्या गाड्या आढवल्याचे ग्रामपंचायत सदस्या गितांजली मुन्तोडे यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्यातील शिबलापुर माळेवाडी हा शासकीय डेपाचा लिलाव सुधीर जायभाजे या ठेकेदाराला मिळाला असुन ग्रामस्तांनी ग्रामसभेत नदीपात्रातुन एक ही कन वाळु उचलुण देणार नसल्याचा ठराव संबधित यंत्रणा दिल्यानंतर ही वाळुवाहतुक सुरू असल्याने नागरिक संतप्त झाल्या व गाड्या आढवल्या.

पुढे बालतांनी ग्रामपंचायत सदस्या गितांजली मुन्तोडे म्हणाल्या की,येथील नदीपात्रा मध्ये कुठे ही गाळ दिसत नाही तसेच नदीपात्रातुन निघणारी वाळु ही गाळ विरहीत असुनही शासनाने या नदी पात्रात गाळ मिस्त्रीत वाळु असल्याचा जावई शोध कसा लावला हा मुळात प्रश्न आहे.ज्या रस्ताने वाळु वाहतुक करण्यात येते तेथुन ठेकेदाराच्या गाड्या जोरात सुरू असतात. सदरचा रस्ता हा अरूद असुन या रस्ता वरून एकच गाडी जाऊ किंवा येऊ शकते.तसेच येथुनच शिबलापुर गावासाठी शासकीय पियजल योजनेची विहीर असुन दोन दिवसापासुन गावाला मिळणाऱ्या पाण्यामध्ये ऑईल मिस्त्रीत पाणी येत होते.

ग्रामपंचायत माजी सरपंच तथा विद्यामान सदस्य सचिन गायकवाड म्हणाले की, ग्रामसभेमध्ये ग्राम महसूल अधिकारी अंकित मंडलिक यांनी ग्रामसभेला माहीती दिली होती की, नदीपात्र ते वाळु डेपासाठी वाहतुकीसाठी ठेकेदारांच्या ४ गाड्याना परवाणगी आहे.असे असतांना ही जेव्हा ग्रामस्थांनी गाड्या आडवल्या त्यावेळी तेथे ५ गाड्या होत्या ? सुर्य़ास्तानंतर वाळु वाहतुक करण्यास परवानगी नाही असे असताना ही ठेकेदार रात्री ८ वाजे पर्यत नदी पात्रातुन वाळु उचलत आहे.याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे गायकवाड नी सांगितले

सकाळी ८ वाजल्या पासुन ग्रामस्त तसेच महिला ह्या तहसीलदाराची वाट बघत थांबले होते.प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधी नी तहसिलदार यांना सदर घटनेची माहिती देण्यासाठी फोन केला होता. पण त्यांनी पत्रकाराचा फोन घेतला नाही. तसेच त्यानंतर ही पत्रकाराना सदर घटनेची माहिती देण्यासाठी फोन ही केला नाही.

ग्रामस्थांनी गाड्या आडवलेल्या घटने बद्दल मंडल अधिकारी बाजीराव गडदे यांनी प्रसारमाध्यामाशी बोलतांना कानावर हाथ ठेवले तर सदर घटने बद्दल आपल्याला माहिती देण्याचा अधिकार नसुन. याबद्दल चा खुलासा हे तहसिलदार करू शकतील असे सांगत वेळ मारून घेतली.घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय सोनवणे, मंडल अधिकारी बाजीराव गडदे, ग्राममहसुल अधिकारी अंकित मंडलीक, सचिन गायकवाड, गितांजली मुन्तोडे किरण मुन्तोडे, संजय मुन्तोडे, किशोर मुन्तोडे,दिलीप गायकवाड,कैलास मांढरे,सुदाम पांडे,शरद शिदे, दत्तु मांढरे, ठेकेदार शरद जायभाये, संग्राम शेळके,योगेश मुन्तोडे,पुनम मुन्तोडे,अंजली मुन्तोडे, जाधव रेणुका मुन्तोडे, गौतमी मुन्तोडे, लहानुबाई मुन्तोडे, दत्तु मुन्तोडे, विनोद मुन्तोडे,विनायक माळी आदी उपस्थित होते.
