आश्वी । झुंजार न्यूज

 

 

सतरा हजाराच्या पुस्तकांचा पुरस्कार मी प्रथमच बघत असून संशोधकांच्या संशोधानासाठी संदर्भ ग्रंथांचे मोठे मोल असते. या स्पर्धेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संशोधन कार्य केलेले संदर्भ ग्रंथ संशोधकांना भेट देण्यात आल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखा विचार करणारे भारताचे भावी नेते अशा स्पर्धेतून तयार होतील असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विदयापीठचे सिनेट सदस्य प्रा. डॉ . नितीन तळपाडे यांनी केले .

आश्वी खुर्द येथे भगवान बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय शोध निबंध स्पर्धेच्या सांगता प्रसंगी त्यांनी काढले. देश – विदेशातून शिक्षण घेतलेल्या तीस जिल्ह्यातील संशोधकांनी या खुल्या शोधनिबंध स्पर्धेत भाग घेतला होता.

Oplus_131072

सुमारे तीन महिन्यापासून सध्याच्या ज्वलंत प्रश्नावर समाजाला दिशा मिळावी या हेतूने संशोधकांची खुली शोध निबंध स्पर्धेचे आयोजिन करण्यात आले होते. लिखाण, सादरीकरण, नाविन्य,संदर्भ यासारख्या विविध टप्प्यावर संशोधकांचा कस लागला.

Oplus_131072

राज्यस्तरिय शोध निबंध स्पर्धेत इगतपूरीच्या प्रेरणा शेजवळ हिचा प्रथम क्रमांक आला. दुसरा क्रमांक अमरावतीचे प्रज्ञेश बनसोड व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संशोधक दिपक तींगेलवार यांना विभागून देण्यात आला. तर तृतीय क्रमांक अहिल्यानगर जिल्ह्यातील वैष्णवी उंबरकर व ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील अनिल शहाकर यांना घोषित करून प्रदान करण्यात आला.

Oplus_131072

सुमारे महिनाभर चालणाऱ्या या दिमाखदार सोहळ्याचे उद्घाटन १४ एप्रिल रोजी आश्वीच्या सरपंच अलका गायकवाड यांनी ध्वजारोहण करण्यात आले होते .

Oplus_131072

 
आश्वी बु॥ येथील सरुपचंद गांधी मार्केट येथे समितीचे कार्याध्यक्ष डॉ. निलेश मुन्तोडे यांच्यासह परीक्षण समिती प्रमुख प्रा. डॉ.नितीन तळपाडे सदस्य इंजी.आप्पासाहेब गायकवाड व सदस्य जीवन भालेराव यांनी शोध निबंध संशोधन केले .

Oplus_131072

यावेळी इस्रायल येथून आलेल्या संशोधक मानसी चव्हाण , आरएसपी विभागाचे समादेशक सिंकदर शेख , फ्रान्सिस पाळंदे,प्रज्ञेश बनसोड, प्रेरणा शेजवळ , इंजी.आप्पासाहेब गायकवाड , जीवन भालेराव आदींनी आपले मनोगत व्यक्त केले .

 

 

Oplus_131072

यावेळी समिती अध्यक्ष संजय मुन्तोडे , समन्वयक अनिल मुन्तोडे , सचिव राजेंद्र मुन्तोडे , सुशील मुन्तोडे , सुरज मुन्तोडे,सिद्धेश मुन्तोडे,सिद्धार्थ मुन्तोडे,शुभम मुन्तोडे ,अखिल मुन्तोडे,प्रणय मुन्तोडे,कैलास मुन्तोडे,बाबासाहेब मुन्तोडे,अर्जुन मुन्तोडे,प्रीतम मुन्तोडे,आकाश मुन्तोडे,चंदन मुन्तोडे, सुधाकर मुन्तोडे,रावसाहेब मुन्तोडे,संगिता मुन्तोडे, शिंदे ,अलिशा मुन्तोडे,रेणुका मुन्तोडे,वर्षा मुन्तोडे,शोभा मुन्तोडे,रेखा मुन्तोडे,बाळासाहेब मुन्तोडे,बाळकृष्ण दरेकर, अन्वर शेख ,सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक भागवत मुन्तोडे ,नामदेव मुन्तोडे,भाऊसाहेब मुन्तोडे ,बबन मुन्तोडे, बाजीराव मुन्तोडे, शैलेंद्र मुन्तोडे, कैलास पगारे, गौतम मुन्तोडे,एकनाथ मुन्तोडे व प्राचार्य जगदीश मुन्तोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed